नागोबुढयाले कर्जमाफी...


थंडीचा कडाका वाढला म्हणून नागो बुढ्यानं फाटकी गोधडी अंगाला आणखीच घट्ट लपेटून घेतली. तुराटीच्या तट्ट्यांचं त्याचं घर थंडीला घरात शिरण्यासाठी अनेक फटींमधून आवतन देत होतं. शेवटी बाभुळीची चार दोन लाकडं गोळा करुन नागो बुढ्यानं अंगणात शेकोटी पेटवली आणि बसला हात शेकत. दोन एकराच्या तुकड्यात वर्ष कसं रेटायचं हा प्रश्न त्याच्यासमोर वर्षभरच आ वासून उभा असे. तो हात शेकत असतानाच सकाळी सकाळी त्याच्या घरी बँकेचा अधिकारी आला. साहेब घरी आला म्हणून बुढ्यानं बुढीला आवाज दिला, ‘यशोदे, चा ठिव सायेबाले.’ यशोदानं बिना दुधाचा, गुळाचा चहा जर्मनच्या पातेल्यात ठेवला. साहेबानं फुर्र फुर्र करत बशीतला चहा घशात ओतला आणि हात शेकत शेकत माहिती दिली, ‘नागो बुढ्या, तुले कर्जमाफी झाली.’ ‘काऊन झाली?’ ‘काऊन म्हणजे? सरकारले तुही दया आली म्हणून झाली.’ ‘पण माही दया सरकारले काय म्हणून येते?’ ‘बुढ्या, अबे तुह्या जिवावरतं समदं चाल्लंनं बे, तू शेतीत राबतं म्हणून लोकायच्या तोंडात चार घास जाते, लोकायच्या तोंडात चार घास जाते म्हणून भरल्या पोटी लोकं नेत्यायची भाषनं आईकते, भाषनं आईकते म्हणून मत द्याले रांगा लावते, मत द्याले रांगा लावते म्हणून सरकार येते आन् सरकार येते म्हणून तुले कर्जमाफी मिळते.’ नागोबुढ्यानच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नच जास्त होते. ‘कोनं देल्ली कर्जमाफी मले?’ ‘कोनं म्हंजे काय बे? सरकारनं देल्ली.’ ‘म्हंजी पंजानं देल्ली की कमळानं देल्ली…’ ‘या वक्ताले कमळाने देल्ली, गेल्या वक्ताले पंजानं देल्ती. मजा हाये लेका तुही तं. सरकार कोनाचंबी आसो, तुले माफी मिळतेच.’ 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    शेतकर्यांचा नावावर हे राजकारणी, अधिकारी व बॅंकवाले हे असे उद्योग करुन स्वतः:ची पोटे भरतात.

  2. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    करूण पण निरागस विनोद! डोळे खाडकन उघडवणारं वास्तव!

  3. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    सुन्दर किस्सा आहे शेतकऱ्यांची थट्टा अशीच सुरू आहे!.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen