‘शून्य ते शिखर’


डिसेंबरमध्ये ठाणे येथे झालेला ‘वेध’ ‘शून्य ते शिखर’ ह्या सूत्राभोवती गुंफलेला होता. इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील अफाट माणसं भन्नाट विचारांची पोती घेऊन जादुगारासारखी समोर आली..

डिसेंबरमध्ये ठाणे येथे झालेला ‘वेध’ची सुरुवात सुरेल झाली. ‘वेध गीत’ आपल्याला खिळवून ठेवतं.  यंदा ‘वेध’गीताची कडवी ‘शून्य ते शिखर’ ह्या सूत्राभोवती फिरणारी होती. सुरुवातीलाच दोन सत्रांची मेजवानी मिळाली. पहिले सत्र होते, दीपक घैसास यांचे. त्यांचे खास वाक्य म्हणजे, ‘शून्य एक सुरवात असते. आपण शून्याला उगाच कमी दर्जा देतो. पण शून्य एक प्रेरणास्थान असते पुढच्या साऱ्या गणतीचे. शून्य म्हणजे पूर्णत्व आहे. १ ते ९ ह्यांतच सामावलेले विश्व शून्यामुळे असंख्य झाले आहे. शून्याने गुणले तर शून्य राहतो पण भागले तर अथांग होतो.’ व्वा! एकदम विचारात गुंतवल त्यांच्या या वाक्यांनी!  आणि सगळ्यात आवडला तो ‘25% Rule’. काही ठराविक कालावधीनंतर आपल्या कामाच्या स्वरुपात २५% बदल करायचा.त्यामुळे आपण स्वतःला आजमावतो आणि त्याचबरोबर नवे शिकत जातो, वाढत जातो, मोठे होतो. दुसरं बीजसत्र होतं- हिंदी चित्रपट, मराठी, गुजराती रंगभूमी, मालिका ह्यांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्याचं. त्यांचे गुरू अल्काझी व National School of Drama (NSD) मधले अनुभव फारच छान होते. त्या म्हणाल्या, ”शिखर मानण्यावर असतं. आपलं शिखर पैसा, प्रसिद्धी हेच मानलं तर आपण एक व्यक्ती म्हणून वाढू शकणार नाही. पण जर प्रयत्न किंवा आपला आनंद हे शिखर मानलं तर आपण स्वतःहून नवी शिखरे शोधू, ती सर करण्याचा प्रयत्न करू आणि तेव्हाच आपण समृद्ध होऊ. अनेक वेळा अनेक [caption id="attachment_10791" align ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen