कोण हुशार, कोण ढ?


हा ‘जात्याच हुशार’ आणि तो ‘ढढ्ढोबा’,  असं मानण्याचं कारण नाही. या लेखातून समजून घ्या आपला मेंदू कसं काम करतो ते! म्हणजे, तुम्ही कधी कुणाला अशी लेबलं लावणार नाही!!

“शौनकच्या आई, तुमचा सल्ला हवाय मला! हा मिहीर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचं म्हणतोय. वर्गातली सगळी मुलं हसली त्याला. म्हणाली, ‘त्या शौनकची बरोबरी करायला निघाला दीडशहाणा! शौनक जात्याच हुशार आहे. ह्या पन्नासाव्या नंबराच्या ढढ्ढोबाला काय जमणार?’ तो हिरमुसलाय. काय करायचं कळेनासं झालंय मला. म्हणून तुमच्याचकडे घेऊन आलेय,” मिहीरची आई गहिवरली. “नक्की जमेल मिहीरला,” त्यांना चहापोहे देतादेता आईने मिहीरला थोपटलं. मग मुलांच्या मध्ये बसून “चला, मिहीरचा मेंदू कसा अभ्यास करणार आहे तेच पाहूया आज,” म्हणत तिने वही-पेन्सिल सरसावली, “काही मुलं जात्याच हुशार असतात अशी आतापर्यंत समजूत होती. पूर्वी तसं शिकवलंच जात होतं. पण ते तसं नाही. ते आता सिद्धच झालंय. गेल्या शंभर वर्षांत विज्ञानाची फार प्रगती झाली. अनेक नवे शोध लागले. मेंदू काम करतो म्हणजे नेमकं काय करतो याचंही संशोधन झालं. कुठली हालचाल करताना मेंदूचा कुठला भाग जागा होतो तेसुद्धा आता तंत्रज्ञानामुळे बघता येतं. सिनेमा बघताना, गाणं ऐकताना, गणितं करताना, भेळ खाताना मेंदूच्या कुठल्या वेगवेगळ्या विभागांत जोरात काम चालतं, त्याचा अभ्यास करता येतो. मज्जापेशीचे भाग मेंदूचं कामकाज कसं चालतं? आपल्या मेंदूचं सगळं काम रसायनं आणि विद्युत्-संदेश यांनी चालतं. आपल्या मेंदूत करड्या रंगाच्या मज्जापेशी असतात हे तुम्हांला माहीतच आहे. प्रत्येक मज्जापेशीला अनेक छोट्या शेंड्या (dendrites) असतात. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen