मुंबई विमानतळावरून प्रत्येक तासाला ५० विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग होते, तरी विमानांची कधी टक्कर होत नाही, कारण 'एअर ट्राफिक कंट्रोल' ही यंत्रणा अहोरात्र काम करत असते... हे काम फार इंटरेिस्टंग आहे.
मित्रांनो, आज आपण आलोय देशातल्या सर्वांत बिझी-बिझी मुंबई विमानतळावर. ते पहा एअर इंडियाचं मुंबई-लंडन विमान आकाशात उडालं... दुसऱ्याच मिनिटाला आकाशातून त्याच धावपट्टीवर उतरतंय एमिरेट्सचं ए ३८० हे ४०० प्रवाशांची ने-आण करणारं महाकाय विमान... अरेच्चा, भल्या सकाळी सात वाजता तर धावपट्टीवरून उड्डाण घेण्यासाठी अगदी टोलनाक्यासारखीच रांग लागते की! यांच्यात कुणी लेनकटिंग वगैरे केलं तर गोंधळच उडेल. मोठी आपत्तीच येईल. पण असं कधी घडत नाही, कारण हवाई नियंत्रण कक्षातले नियंत्रक या सर्व विमानांना दिशादर्शन करत असतात आणि त्यांच्या उड्डाणांचं नियंत्रणही करत असतात. त्यामुळेच तर मुंबईसारख्या अत्यंत व्यग्र विमानतळावर तासाला तब्बल ५० विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग हाताळण्याची कामगिरी विमानतळ व्यवस्थापनाला शक्य होते. विमानं उडवणाऱ्या वैमानिकांइतकाच हा जॉबही रोमहर्षक आहे. त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही विमानतळाच्या जवळ आल्यावर तुम्ही एक काहीसा गोलाकार केबिन असलेला मनोरा किंवा टॉवर पाहिला असेल. या मनोऱ्यातच हवाई वाहतुकीचं नियंत्रण करणारे, विमानतळावर येणाऱ्या विमानांना दिशादर्शन करणारे, तसंच हवेत झेपावणाऱ्या विमानांना मार्गस्थ करणारे नियंत्रक काम करत असतात. या मनोऱ्याला एटीसी म्हणजेच ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ असं म्हणतात आणि त्यात कार्यरत असलेल्या नियंत्रकांना ‘एटीसीओ’ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ArunBhandare
5 वर्षांपूर्वीअतिशय माहितीपूर्ण लेख.
Rajeshvaze
5 वर्षांपूर्वीसुंदर लेख..