सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (पूर्वार्ध)


हाय फ्रेंड्स! आता तुमच्या हातात स्मार्टफोन आलाय. काहीजण स्वत:चा, काहीजण पालकांचा फोन हाताळू लागला आहात. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’चा अनुभव तुम्ही घेत आहात. तुमच्यापैकी बरेच जण सोशल मीडिया वापरू लागलेले आहात. कोणी फक्त whatsapp, कोणी facebook, कोणी insta अशी वेगवेगळी माध्यमे वापरत आहे. ही माध्यमे प्रचंड पॉवरफुल आहेत. त्यांची ताकद जबरदस्त आहे. त्यांच्या मदतीने आपल्याला अनेक गोष्टी करता, पाहता, जाणून घेता येत आहेत. अशी माध्यमे तुम्ही सहजपणे वापरत असताना तुमचे पालक, शिक्षक अशी मोठी माणसं जरा काळजीत पडली आहेत. कारण ही माध्यमे तुमच्यावर कोणते राक्षसी परिणाम करणार नाहीत ना, ही भीती त्यांना वाटते आहे. ती भीती उगाचच नाही. त्यांची भीती दूर करायची तर तुम्ही ही माध्यमे अतिशय जबाबदारीने वापरायला हवी. पण जबाबदारीने म्हणजे कशी, हे आपण हृषिकेश जोशी यांच्याकडून समजून घेऊया.

अभिनेता, लेखक म्हणून तुम्ही हृषिकेश जोशी यांना ओळखत असाल. त्यांनी ‘समाजमाध्यमे’ या विषयाचा खूप विचार आणि अभ्यास केलाय. लॉकडाऊनच्या काळात नाटक हा प्रकार थिएटरमध्ये होऊ शकत नसताना त्यांनी या माध्यमाचा उत्तम वापर करून 'नेटक' हा आगळावेगळा प्रयोग केला.

हृषिकेश जोशी यांच्याशी आम्ही जेव्हा सोशल मीडिया कसा वापरावा, या विषयावर गप्पा मारल्या, तेव्हा त्यांनी तुम्हांला अतिशय मौल्यवान ठरतील असे विचार मांडले. ते समजून घ्या! आणि हो, हे विचार फक्त तुम्हा मुलांसाठीच नाहीत तर तुमचे पालक, ताई-दादा सर्वांसाठीही फार उपयुक्त आहेत. त्यांनाही वाचायला द्या हं!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Sandhya Tembe

      3 वर्षांपूर्वी

    Excellent,

  2. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख लेख. पूर्णपणे सहमत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen