खूप खूप वर्षांपूर्वी आपले पूर्वज कसे राहात होते? माणूस म्हणून कसे जगायचे, कसे वागायचे हे माणूस कसेकसे ठरवत गेला? या गोष्टी त्या त्या समाजात आणि पुढच्या पिढीपर्यंत कशा पोहोचविल्या?... सर्व प्रदेशातील समाजांमध्ये हे सांगणाऱ्या लोककथा प्रचलित आहेत. महाराष्ट्रात सणावारांच्या 'कहाण्या' आहेत, कीर्तनातील 'आख्याने' आहेत. तशाच या अरुणाचल प्रदेशातील लोककथा आहेत. या कथांमधून उभे राहाते ते तेथील पूर्वकालीन मानवी जीवन, अरुणाचल प्रदेश, तेथील सुंदर निसर्ग, तेथील तत्कालीन समस्या, माणसांनी वेळोवेळी केलेला योग्य विचार व घेतलेले निर्णय. हे त्यांच्याविषयी जेवढे सांगतात तेवढेच आपल्या एकूणच माणुसकीच्या भावना जागृत करतात. सुरेख, ओघवत्या भाषेमुळे या कथा मनात रुजतही जातात. प्रत्येक गोष्टीतून नवे नवे अर्थही उलगडत जातात...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीछान आहे लेख
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीछान. वेगळ्या वातावरणातील कथा.
dhananjay deshpande
4 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख,भुतदयेमुळे हरिणाचे प्रयाण वाचले.