‘माझे किशोरवय’ या सदरात भेटणार आहोत, ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांना. ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’मधले चिमणराव, ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातली चेटकीण, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या टी.व्ही. मालिकेतले आबा टिपरे, ‘बोक्या सातबंडे’ चित्रपटातले बेलवंडी आजोबा, ‘चिंटू’ चित्रपटातले जोशी काका, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातले महात्मा गांधी, ‘फास्टर फेणे’ या चित्रपटातले ‘भा. रा. भागवत’ अशा अनेक भूमिका करणारे हे कलाकार तुम्हांला माहीत आहेतच. त्यांनी लिहिलेली ‘बोक्या सातबंडे’ ही पुस्तकांची मालिका तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल. या पुस्तकाला दोन वेळा राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे आणि ‘बोक्या सातबंडे’च्या चौथ्या आणि पाचव्या भागांसाठी दिलीप प्रभावळकर यांना साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सुरुवातीला अनेक वर्षं त्यांनी नोकरी सांभाळून कलाक्षेत्रात काम केलं. दिलीप प्रभावळकर यांनी ‘बायोफिजिक्स’ या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ इथून ‘रेडिएशन टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केला आहे. अशा या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे किशोरवयीन दिवस कसे होते, ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया! अशा कर्तृत्ववान व प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या किशोरवयात नेमक्या कशा होत्या, त्यांनी तेव्हा काय काय केलं, जे त्यांना पुढे कायम उपयोगी पडलं, हे आपण या सदराच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prakash Khanzode
4 वर्षांपूर्वीकुतुहूल आणि सर्व काही टिपून घेण्याच्या वृत्तीचा हा परिपाक वाटतो. प्रभावळकरांच्या बालपणीची कथा अगदी सहज सुंदर वाटते, त्यांच्या अभिनय-कौशल्यासारखीच! धन्यवाद बहुविध !!
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीअफलातून व्यक्तिमत्व,सर्वांग सुंदर सादरीकरण,विनोदाची प्रचंड जाण काय काय म्हणूनसुद्धा द्यावी,शब्दसुध्दा कमीच पडतात एकदम कडक सलाम