दिलबरो

वयम्    पूजा सामंत    2019-02-02 18:04:21   

'उडता पंजाब’, 'राजी’ अशा आशयघन चित्रपटांत उत्तम अभिनय केलेली अभिनेत्री आलिया भट्ट या लेखातून आपल्याशी संवाद साधत आहे. ज्या भाषेत आणि भावनेतून ती 'वयम्’शी बोलली, त्याच पद्धतीने पूजा सामंत यांनी ते शब्दांकित केलंय. 'राजी’ चित्रपटात तिच्यावर चित्रित झालेलं एक छान गाणं आहे.. लग्न होऊन सासरी जाणारी 'सहमत’ तिच्या लाडक्या बाबांना म्हणते- 'ऊँगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, देहलीज़ ऊँची है ये पार करा दे’ म्हणजे, तुम्ही जसं मला पहिलं पाऊल टाकायला शिकवलंत, तसंच तुमचं मार्गदर्शन मला कायम लागणार आहे. मोठी आव्हानं पेलायची आहेत मला, त्यासाठी तुमचा आधार हवाय!’ वडिलांबद्दल कृतज्ञता पाळणारी आणि त्यांचे आशीर्वाद मागणारी ही मुलगी प्रत्यक्ष जीवनातही असाच कृतज्ञताभाव मनात बाळगते. या संवादात हेच तर ती आपल्याला सांगतेय... माझं टोपणनाव काय आहे, ठाऊक आहे तुम्हांला? एनी गेसेस? 'आलू’. हो, मी मॉम-डॅड साठी 'आलू’ आहे... आलियाचा शॉर्ट फॉर्म- आलू! हसू नका. मी माझ्या लहानपणी खूप गोल गरगरीत होते, अगदी तुमच्या फेव्हरेट बटाट्यासारखी! आजही डॅड मला 'आलू’ हाक मारतात. ते मला खूप गोड वाटतं, त्यांच्या तोंडून 'आलू’ ही हाक ऐकणं! मित्रांनो, मी शाळेत असतानाची एक गंमत सांगावीशी वाटते. मी मुंबईतल्या जुहू भागातील 'जमनाबाई नरसी’ शाळेत शिकलेय. मला शाळा आवडत नसे, याचं एक मुख्य कारण म्हणजे, शाळा सकाळी सात वाजता असे. सात वाजता शाळा गाठायची म्हणजे मला सकाळी सहा वाजता उठणं भाग होतं. आईलाह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen