अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
कविवर्य सुरेश भट ह्यांना विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने...
खू प दिवसांनी त्याला मी त्या दिवशी पाहिला. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. रविभवनमध्ये माझ्या अगोदरच तो येऊन बसलेला दिसला. गेल्या गेल्या मी त्याला नमस्कार केला. त्याने उलट नमस्कार करून मान वळवली. मी त्याच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो. काय करावे ते न सुचून शेजारच्या मुलीशी तो हास्यविनोद करीत बसला. विनोद नेहमीसारखेच स्फोटक असावेत, कारण त्या मुलीला अशा विनोदांवर चारचौघांत हसण्याचा संकोच वाटत होता. त्याच वेळी हसणे आवरताही येत नव्हते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .