अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
महापूजेचे निमंत्रण सर्वस्वी अनपेक्षित होते. श्री विठ्ठलाची महापूजा ही दरवर्षी फक्त मुख्यमंत्री करतात, एवढे माहीत होते. दूरदर्शनवर तिची दृश्ये पाहिली होती. पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा आपण करणार? विश्वासच बसेना. श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या पलीकडे नेणारा मधु मंगेश कर्णिक यांना आलेला एक आगळा अनुभव
********
देव धर्म आणि यांवरील श्रद्धा यांमुळे माणसाच्या जगण्याला मोठा आधार मिळतो, असे मानणारा मोठा वर्ग समाजामध्ये असतो आणि तो जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतो. व्यक्तिश: मी या वर्गामध्ये मोडतो का, याचा मी अनेकदा विचार करतो. कारण या बाबतीत माझी नेहमी द्विधा मनःस्थिती असते.
माझ्या घरी बालपणापासून मी श्रद्धाळू वातावरणात वाढलो. माझे वडील कितपत धार्मिक वृत्तीचे होते, ते मला माहीत नाही, कारण ते मी अगदी असतानाच हे जग सोडून गेले. पण ते श्रावणात गावकऱ्यांना जमवून त्यांना पोथी वाचून दाखवत, हे मला अंधूक आठवते. माझे आजोबा विवेकानंदांच्या शिकवणीच्या प्रभावाने, त्यांचा शोध घेत परागंदा झाले. आई पूर्णपणे आस्तिक आणि श्रद्धाळू. तिच्या भाविकपणाला तोड नसे. तिचे उपासतापास, व्रतवैकल्ये कधी चुकली नाहीत. एकादशी, संकष्टी, सोमवार, शनिवार हे उपवास न चुकता करी. इतके असूनही तिच्या नशिबाची दुःखे आणि अपेष्टा नाहीशी झाली नव्हती. स्वतः मी अजाण वयात जगाचे टक्केटोणपे खात वाढलो. जग स्वार्थी मतलबी असते निष्ठुर असते, याचा मी आईवडिलांचे छत्र हरपल्यापासून कोवळ्या वयात अनुभव घेतला आणि तो अनुभव दिवसेंदिवस गडदच होत गेला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vilas Ranade
4 वर्षांपूर्वीअजि म्या ब्रम्ह पाहीले! अतिशय सुंदर लेख आहे.मधु मंगेश कर्णिक यांनी केलेले विठ्ठल पूजेचे वर्णन वाचून आपण प्रत्यक्ष पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात असल्याचा प्रत्यय येत होता.