मानवी मेंदूतील रहस्यांचा शोध


आजच्या  ज्ञात जगात सर्वात गुंतागुंतीची गोष्ट म्हणजे माणसाचा मेंदू ! त्याचे वजन आपल्या शरीराच्या फक्त दोन टक्के एवढे,पण त्याला रक्तपुरवठा मात्र एकूण रक्ताच्या वीस टक्के इतका होतो.हा मेंदू आपला कर्ता,आपले आकलन,आपली कृती बऱ्याचदा तोच ठरवतो. पण तो कसे काम करतो याचे संशोधन नव्वद सालापर्यंत फार झाले नव्हते. तोपर्यंत अपघातात मेंदूला कोणत्या भागाला इजा झाली आणि त्यामुळे शरीराच्या कोणत्या  कामांवर परिणाम होतो यावरून कोणत्या भागाचे काय काम असावे हे ठरवले जायचे.पण नव्वदच्या दशकात मेंदूच्या फंक्शनल एम.आर.आयचा शोध लागला त्यामुळे माणूस काम करीत असताना त्याच्या मेंदूतील कोणत्या भागात अधिक रक्तपुरवठा होतो आहे हे समजू लागले. त्याचवेळी अमेरिकन कॉंग्रेसने ते दशक 'ब्रेन डीकेड' म्हणून जाहीर केले त्यामुळे मेंदू संशोधनाची गती खूप वाढली.  या संशोधनातून मानवी मेंदू आणि त्याचा आपल्या वागण्यावर होणारा परिणाम यातील बऱ्याच गूढ गोष्टीची उकल होऊ लागली. आपण येथे अशाच काही गोष्टी,मेंदूचे नवीन संशोधन आणि त्याचे आपल्या रोजच्या आयुष्यावर होणारे परिणाम समजून घेणार आहोत.या संशोधनाच्या माहितीमुळे रोज घडणाऱ्या काही घटना  का घडतात हे उलगडू लागले आहे.आपल्या मेंदूशी संबंधित काही समजुती चुकीच्या होत्या याचे आकलन  होऊ लागले आहे.आपली स्वप्ने अतार्किक का असतात,एकाला जांभई आली की दुसऱ्याला का येते,गद्धे पंचविशी ही म्हण का खरी आहे अशा अनेक प्रश्नांना उत्तरे मेंदूच्या संशोधनातून मिळत आहेत.अशाच काही संशोधनांचा  गोषवारा येथे वाचायला मिळेल. १. तुम्हाला ती माकडे आणि टोपीविक्या माणूस यांची गोष्ट आठवते आहे का? टोपी विकणाऱ्या माणसाच्या टोप्या माकड

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , ज्ञानरंजन , विज्ञान- तंत्रज्ञान , मेंदू विज्ञान

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    डॉ यश वेलणकर यांचे लिखाण खूप छान, मार्गदर्शक असते व मुख्य म्हणजे सोप्या भाषेत केलेली मांडणी. त्यांचे श्री व सौ हे पती पत्नी नातेसंबंध चांगले ठेवण्याचे द्रुष्टीने मार्गदर्शन पर पुस्तक अवश्य वाचा

  2. Anand bamne

      7 वर्षांपूर्वी

    How online regisatar

  3. दीपक खंडागळे

      8 वर्षांपूर्वी

    अत्यंत उपयोगी माहिती. धन्यवाद. या विषयावर लेख माला व्हायला हवी. नम्र विनंती.

  4. kiran bhide

      8 वर्षांपूर्वी

    तोच विचार आहे. डॉ वेलणकर यांचा या विषयाचा अभ्यास दांडगा असल्यामुळे त्यांना तशीच विनंती केलेली आहे.

  5. nbgadgil

      8 वर्षांपूर्वी

    अप्रतिम.....फारच छान..... क्लिष्ट विषयावर सोप्या तरीही रंजक पद्धतीने केलेलं लिखाण !!! पण खूपच थोडं वाटलं......खरं तर या विषयावर लेखमाला लिहायला हवी वेलणकर साहेबांनी........... त्यांचं अभिनंदन.....

  6. अमर पेठे

      8 वर्षांपूर्वी

    अतिशय छान माहिती. ह्याच विषयावर अजून काही सखोल माहिती व घर बसल्या करावयाच्या उपाययोजना समजल्या तर बरं होईल.

  7. mugdhabhide

      8 वर्षांपूर्वी

    he wachalyawar ajun wel geleli nahi, माईंडफुलनेस, सजगता ध्यान he shikun ghetale tar ajunahi barach kahi aapan karu shakato asa watayla lagalay. khoop chhan, effective

  8. APARNA

      8 वर्षांपूर्वी

    Khupach Sundar

  9. विनय सामंत

      8 वर्षांपूर्वी

    फार छान

  10. Smita

      8 वर्षांपूर्वी

    Khup abhyaspurna lekh aahe ...manavi mendu sarakha clisht vishay atishay sopa karun sangitala aahe ...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen