कळते पण वळत नाही


शैलाला राग कमी करायला हवा हे कळते पण प्रत्यक्ष प्रसंग येतो त्यावेळी ती रागावतेच. किरणला नखे खाण्याची सवय बदलायची आहे पण तो विचारात असतो त्यावेळी बोटे तोंडात जातात. राधिका अस्वस्थ होते त्यावेळी तिच्या आवाजाचा टोन तिच्या नकळत वाढत जातो. सोनियाला झुरळ घाबरण्यासारखे नाही हे कळते पण ते समोर दिसले की ती नकळत किंचाळते. अबीरला पोर्न पाहण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत पण रात्री मोकळा वेळ मिळाला की तो ते टाळू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या बुद्धीला पटत असतात पण कृतीत येत नाहीत.पटकन रागवायचे नाही, अंध प्रतिक्रिया द्यायची नाही, योग्य प्रतिसाद निवडायचा अशा अनेक गोष्टी आपल्याला मान्य असतात. भाषण करण्यात घाबरण्यासारखे काय आहे, झुरळ पाहून दचकण्यासारखे काहीही नाही हेही पटलेले असते पण प्रत्यक्षात तो प्रसंग येतो त्यावेळी प्रतिक्रिया दिली जाते, भीती वाटते, राग येतो. हे असे का होते संत आणि साधू पुरुषांनी हे पूर्वीच अनुभवले होते. म्हणूनच रामदासांनी क्रियेवीण नानापरी बोलिजेंते। परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥ मना कल्पना धीट सैराट धांवे। तया मानवा देव कैसेनि पावे॥ असा मनाचा श्लोक  लिहिला आणि सैराट वागण्याचे कारण सांगितले. तुकारामानीही सकल इंद्रिया पडिले वळण असे म्हणून केवळ बुध्दी वागण्यात बदल करू शकत नाही हे स्पष्ट केले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 महिन्यांपूर्वी

    खूपच छान ! इतक्या लवकर लेख मालिका संपली की काय ?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen