सर्वव्यापी कंटाळा


रोज तेच तेच काम करून अमर कंटाळला होता,रजाही शिल्लक होत्या. त्यामुळे सलग चार दिवस सुटी घेऊन अमरचे कुटुंबिय कोठेतरी फिरायला जायचे ठरवित होते पण मुलांचे क्लासेस असल्याने ते शक्य झाले नाही. तरीदेखील त्याने रजा घेतलीच. रजेच्या तिसऱ्या दिवशी अमर कंटाळला  होता. टाईमपास म्हणून त्याने टी.व्ही. सुरु केला. सर्व चॅनेल सर्फ करून झाली, न्यूज चॅनेल्स त्याच त्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवित होती. मराठी चॅनेलवर दुसऱ्या नवऱ्याची तिसरी बायको चौथ्या मित्राशी कारस्थान रचत होती. अमर वैतागला, त्याने एक शिवी घालून टीव्ही बंद केला आणि तो मोबाईलवर पोस्ट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला त्याचाही कंटाळा आला. अमरची तिसरीतील मुलगी तर नेहमीच बोअर झालेली असते. एक गेम खेळू लागली कि दहा मिनिटात ती बोअर होते आणि दुसरा गेम शोधू लागते. तिला तर जेवणाचा देखील कंटाळा येतो मग तीची आई तिला जबरदस्तीने भरवत असते. तिलाही मुलांच्या वागण्याचा कंटाळा येतो, पण कुठे फिरायला जायला देखील ती गर्दीमुळे कंटाळली आहे. सध्या कंटाळा सर्वव्यापी झाला आहे. कोट्यावधी रुपयांची एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीज हा कंटाळा, बोअरडम दूर करण्यासाठीच काम करते आहे. गंमत म्हणजे दुसऱ्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी माणसेही स्वतः कंटाळत असतात. तो कंटाळा घालवण्यासाठी पार्ट्या करतात, ड्रिंक्स घेतात, नवीन सेक्स पार्टनर शोधतात, हरणांची शिकारसुद्धा करतात.

का येतो असा कंटाळा? त्याचे  कारण मेंदूत आहे का या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना गवसले आहे. या बोअरडमवर विजय मिळवायचा असेल तर कंटाळा येतो त्यावेळी मेंदूत काय घडते, हे प्रमाण कमी करायचे काही उपाय आहेत का हे समजून घ्यायला हवे. कंटाळा

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , आरोग्य , मनसंवाद , व्यक्तिमत्व विकास

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख . आवडला . न कंटाळा करता वाचला

  2. rupali

      7 वर्षांपूर्वी

    respected sir i am reader of your blog and each one is best of best.all of are full of scientific information

  3. sureshjohari

      7 वर्षांपूर्वी

    आवडला

  4. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    लेख मात्र अजिबात कंटाळवाणा नव्हता.

  5. Dr Yash Welankar

      7 वर्षांपूर्वी

    निशिकांत राव,तुमचा इंग्रजी शब्द टाळण्याचा आग्रह योग्य आहे।पण मेंदू विज्ञानातील संशोधन इंग्रजी मधूनच प्रसिद्ध होत असते आणि मेंदूतील विविध भागांना दिलेली नावे किंवा रसायनांची नावे इंग्रजीत असतात।प्री फ्रंटल कोरटेक्स याला मेंदूचा सर्वात पुढील भाग असे म्हणता येईल पण डिफॉल्ट मोड नेटवर्क याला किंवा सिंग्यूलेट कोरटेक्स याला मराठी शब्द कोणते वापरणार? माझी तुम्हाला विनंती आहे की लेखाचा मतितार्थ समजून घेऊन त्यावर काही प्रश्न विचारा। मी मराठी शब्द लिहिण्याचा आळस करीत नाही म्हणूनच सर्जनशीलता हा शब्द वापरतो।पण बोजड मराठी शब्दांपेक्षा प्रचलित इंग्रजी शब्द वापरले तर लेखन समजायला सोपे जाते असे वाटते।लोकांना रक्तदाब शब्दांपेक्षा ब्लडप्रेशर शब्द अधिक सोपा आणि परिचित वाटतो।त्यामुळे मी ते दोन्ही शब्द वापरतो। तुम्ही आवर्जून लेख वाचता आणि अभिप्राय लिहिता यासाठी हार्दिक धन्यवाद।पण इंग्रजी शब्द किती आहेत ह्याचा विचार करण्याऐवजी नवीन विचार काही कळला का याला अधिक महत्व द्यावे एवढीच नम्र विनंती।

  6. निशिकांत

      7 वर्षांपूर्वी

    प्रिय यशवंतराव, आळस झटकून जास्तीत जास्त शब्द मराठीत लिहिण्याचा कंटाळा केला नाहीत. आभार.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen