ओजस बारावीला आहे. तो क्लासला जायला म्हणून घरातून बाहेर पडला, पण अर्ध्या तासाने त्याच्या आईला फोनवर त्याचा मेसेज आला की मला अभ्यासाचा कंटाळा आल्याने मी वाईल्डलाईफ अनुभवायला रणथांबोर येथे जात आहे. आई हा मेसेज पाहून चक्रावली. खात्री करण्यासाठी तिने क्लासला फोन लावला. क्लास मालकाने त्यांच्या वर्गात पाहिले आणि ओजस आलेला नाही असे सांगितले.ओजसच्या आईने मेसेजची हकीकत त्यांना सांगितली.सोबत कोणतेही सामान न घेता ,कोणतीही पूर्व तयारी न करता हा अचानक असा निघून गेल्याने नक्की काय करायचे हा दोघानाही प्रश्न पडला होता. त्यांनी आत्ता रणथांबोरला जाणारी ट्रेन आहे का पाहिले, ती होती. मग त्यांनी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ओजस रणथांबोरला पोचला त्यावेळी त्याचे स्वागत करायला तेथे पोलीस होते. ते त्याला पुन्हा घरी घेऊन आले. पौगंडावस्थेतील बरीच मुले अशी सैराट वागतात. प्रेमात पडून किंवा थ्रिल म्हणून घरातून पळून जातात, छोट्या छोट्या कारणांनी हिरमुसतात, मोबाईल गेमच्या नादाला लागून रस्त्याने धावत सुटतात, काहीजण तर आत्महत्याही करतात. का वागतात या वयातील मुले अशी? त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? सध्याच्या सोशल मेडियाचा हा परिणाम आहे का? मन्मथ म्हैसकरच्या धक्कादायक मृत्यूनंतर पुण्यात एनडीए मधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावेळी अनेक ठिकाणी या विषयावर बातमी आणि मानसरोगतज्ज्ञाची मते प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये या आत्महत्या नैराश्यामुळे होतात आणि त्या नैराश्याचे एक कारण सोशल मिडिया आहे असे सर्वांनी सांगितले आहे. सोशल मीडियामुळे नैराश्य का येत असावे?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
PUSHKAR TAMHANKAR
4 वर्षांपूर्वीसोप्या भाषेत व सर्वाना सहज समजेल व उपयोगी माहिती . माईंडफुलनेसचे ट्रेनिंग बद्दल माहिती मिळेल का ?
Satish Rajgure
4 वर्षांपूर्वीअप्रतिम आणि सविस्तर माहिती असलेला लेख!
Potdar100
7 वर्षांपूर्वीछान ..
ssaptarshi
7 वर्षांपूर्वीधन्यवाद ! उपयुक्त माहिती सोप्या मराठी तून मिळाली!
Rahul
7 वर्षांपूर्वीखुपच छान
mdurugkar
7 वर्षांपूर्वीलेख बरा वाटला.
9322496973
7 वर्षांपूर्वीखुप छान आणि आभ्यासपूर्ण असा हा लेख आजच्या तरुणाईला आणि त्यांच्या पालकांना नक्कीच मार्ग दर्शक आहे.
ambarishk
7 वर्षांपूर्वीnehemi pramanech mihitipurna lekh! Tumche lekh vachun majhyat manasshastra baddal avad nirman zali aahe.
Monika
7 वर्षांपूर्वीखूपच छान लेख. सर्व पालकांनी वाचायला हवा. उपयोगी माहिती आहे.
Monika
7 वर्षांपूर्वीखूपच छान लेख. सर्व पालकांनी वाचायला हवा. उपयोगी माहिती आहे .
raginipant
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख...... गरज आहे ती मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी वाचण्याची..
रोहिणी
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख....परंतु गरज आहे ती तरुण मुले व त्यांच्या पालकांनी वाचण्याची
sureshjohari
7 वर्षांपूर्वीलेख आवडला .
BGS
7 वर्षांपूर्वीVery Nice Article !!
swagatsawant
7 वर्षांपूर्वीनुकताच 'आणि अर्जुन खरंच भागला' हा व्हायरल व्हिडिओ पाहिला. प्रसिद्धी साठी तान्ह्या बाळाचा बेमालूम छळ मांडलाय!
जीतेंद्र घोडके
7 वर्षांपूर्वीगुड इफर्मेशन
amolss
7 वर्षांपूर्वीखुपच छान लेख....
arya
7 वर्षांपूर्वीछान !आवडला लेख...
Smita
7 वर्षांपूर्वीलेख आवडला ... सोप्या भाषेत पौगंडावस्थेत शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगितले आहेत ... mindfulness चे असे training पालक आणि मुले यांच्या साठी मन:शक्ती आश्रम लोणावळा येथे वर्षभर वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून उपलब्ध असते ...
Smita
7 वर्षांपूर्वीलेख आवडला ... सोप्या भाषेत पौगंडावस्थेत शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगितले आहेत ... mindfulness चे असे training पालक आणि मुले यांच्या साठी मन:शक्ती आश्रम लोणावळा येथे वर्षभर वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून उपलब्ध असते ...
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीखूप छान शास्रिय उपयुक्त माहिती. आपल्याकडे शाळा नाही देत ट्रेनिंग किंवा अशी सेंटर्स नाहीत पण मग पालकांनी कसे ट्रेनिंग द्यावे किंवा परिस्थिती कशी हाताळावी हे कळले तर छानच