सुख दुखते


प्रतिभाच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे.दोन हुशार मुलगे ,सुविद्य सुना, नातू आहेत, पुरेसा पैसा आहे. ती नवऱ्याबरोबर दरवर्षी एक परदेश प्रवास करून येते.पण असे असूनही ती आनंदी आहे असे फार कमी वेळ असते. सतत दुसऱ्या व्यक्तीकडून काहीना काही अपेक्षा आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की दुखः हे कायमचेच असते. त्यांनी एखादा कार्यक्रम केला आणि त्याला बोलावलेली वीस माणसे आली तरी जी दोन माणसे आली नाहीत त्यामुळे प्रतिभा दुखी असते. ती सतत माहेरच्या माणसांनी काय केले नाही याचीच आठवण काढीत, दुखः उगाळत बसलेली असते. कुणी या विषयात तिच्याशी बोलू लागले की तिला लगेच रडू फुटते.असे का होते  मेंदूच्या या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे. आपला मेंदू दुःखद प्रसंग अधिक ठळकपणे लक्षात ठेवतो. तुमची कुठल्याही व्यक्तीशी झालेली भांडणे किंवा कटू प्रसंग सहजपणे, लगेच आठवतात. याचे कारण आपली उत्क्रांती होत असताना असे प्रसंग धोक्याची घण्टा वाजवणारे ठरत होते. भीतीदायक प्रसंग कायम लक्षात राहिल्याने आपला पूर्वज, आदिमानव योग्य ती काळजी घेऊ शकत होता.विपरीत परिस्थिती,संकटे टाळण्यासाठी संकटे,धोके लक्षात राहणे आवश्यक होते.त्यामुळे कोठे अजगर असतो ते त्याच्या स्मरणात राहत होते. त्यासाठीच असे प्रसंग माणसाच्या  अमायग्डला आणि हिपोकँम्पस या मेंदूच्या भागात कायमचे कोरले जातात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान - आवडता .

  2. Deepak Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    खुप उपयुक्त माहिती . जरूर वापरात आणेन

  3. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen