अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन) , मे २०२१
ऐन सतरा-अठरा वर्षांचा असताना ग्रेस पहिल्यांदा माझ्या हाती लागला.तेव्हा तो 'तरुण भारत'मध्ये 'मितवा' नावाचं सदर लिहीत होता.तेव्हा मला त्यातलं नेमकं काय कळत असेल देव जाणे, पण हे सदर मात्र मला खूप आवडायचं आणि झपाटल्यासारखा मी ते नियमित वाचत असे.'ग्रेस' नावाचा हा कोणी फार मोठा कवी आहे, हेही तेव्हा कदाचित माझ्या गावी नव्हतं.मितवाने माझ्या मनाची जमीन नांगरली गेली असल्यामुळे की काय कोण जाणे, पण नंतर जीएंचं काजळमाया जेव्हा हाती लागलं तेव्हा त्यानेही मी झपाटून गेलो होतो.लिहिणाऱ्या प्रतिभावंतांची जशी एक जातकुळी असते तशीच वाचणाऱ्या रसिकांचीही एक जातकुळी असते आणि ती बहुधा याच वयात तयार होत असावी.ग्रेसनी दिलेल्या 'मितवा'च्या दीक्षेमुळेच कदाचित मग पुढे जीए, नेमाडे, एलकुंचवार, सुभाष अवचट, हृदयनाथ मंगेशकर हा पंथ मला भावू लागला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dr. Anil Sangle
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लिखाण ...
Jagadish Palnitkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख...ग्रेस ह्यांच्या दुर्बोधतेला नाकं मुरडणं किंवा त्याचं भाबडं कौतुक करणं ह्या दोन टोकांपेक्षा एका विचारी भूमिकेतून लेख लिहिला आहे.....सुरेख!!
Anant Tadwalkar
4 वर्षांपूर्वीचंद्र माधवीच्या प्रदेशातले ग्रेस .. शेवाळकर यांच्या या अप्रतिम लेखनामुळे बराच काळ स्मरणात राहतील.