निरोगी वार्धक्यासाठी


आपले शरीर सतत बदलत असते. शरीराची वाढ होते, ते परिपक्व होते. व वाढत्या वयाबरोबर त्याची झीज होऊ लागते. त्यामुळे शरीरात बदल दिसू लागतात. त्वचेतील कोलॅजेन व त्यासोबत पाणी धारण करण्याची क्षमता कमी होऊ लागल्याने तिची लवचीकता कमी होते, सुरकुत्या पडू लागतात. रक्तवाहिन्यांचीही नैसर्गिक लवचीकता कमी होते, त्या अधिक ताठर होतात. त्यांच्या आतील पोकळीत कोलेस्टरॉल. कॅल्शियम यांचे थर साचू लागल्याने ती कमी होऊ लागते. अगदी छोट्या रक्तवाहिन्यांचीही आतली पोकळी कमी झाल्याने शेवटच्या पेशीपर्यंत रक्त पोचवण्यासाठी रक्तावरील दाब, ब्लडप्रेशर वाढते. सांध्यातील कार्टिलेज झिजल्याने ते आखडतात, दुखू लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यामुळे आघाताशिवाय देखील मोडू शकतात. फुप्फुसांची लवचीकता कमी होते. वयाच्या सत्तराव्या वर्षी, त्यांची क्षमता वयाच्या विसाव्या वर्षाच्या क्षमतेपेक्षा चाळीस टक्के कमी होते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , डिजिटल पुस्तक , आहार , निद्रा , भय...
आरोग्य

प्रतिक्रिया

  1. Jayashree Gokhale

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात शब्दात आरोग्यासाठी महामंत्र सांगीतला. सगळे साधे व सोपे करून सांगितले.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen