श्वास- मनाचा लगाम


श्वास हेच चैतन्याचे लक्षण. आपले लक्ष नसतानाही त्याचे जाणे येणे चालूच असते. जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या रडण्यातून तो सुरु होतो, तो मृत्यूपर्यंत अविरत आपली साथ करतो. त्या श्वासाचे न्यारे तंत्र आहे, तो आपल्या शरीरातील एक सेतू आहे. ऐच्छिक क्रियांकडून अनैच्छिक क्रियांकडे, बाह्यमनाकडून अंतर्मनाकडे, ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाणारा रस्ता आहे. आपण आपल्या इच्छेने हातपाय हलव शकतो. ती कृती आपल्या बहिर्मनाच्या ताब्यातील आहे. पण आपण आपल्या आतड्यांची हालचाल किंवा हृदयाचे ठोके केवळ इच्छेने कमीजास्त करु शकत नाही. त्यांचे नियंत्रण अंतर्मनात असते. अचानक मोठा आवाज आला की धडधड आपल्याला जाणवते. आपल्याला ती नको असते पण ती कमी करता येत नाही. हृदयाच्या गतीप्रमाणेच रक्तावरील दाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, आतड्यांची हालचाल, शरीराचे तापमान, तोंडातील लाळस्राव यावर आपल्या इच्छेचे नियंत्रण नसते. अंतर्मनातील भावनांचे त्यांच्यावर नियंत्रण असते. फक्त श्वासोच्छ्वास ही क्रिया या दोन्ही प्रकारच्या क्रियांना अपवाद आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

 1. Amol Suryawanshi

    3 आठवड्या पूर्वी

  THANKS, DOCTOR. Very Important information in very simple laguage

 2. Pramod Kataria

    4 महिन्यांपूर्वी

  खूपच उत्तम विषय व तेवढीच उत्तम मांडणी

 3. Vilas Ranade

    4 महिन्यांपूर्वी

  श्वासोश्वासाबाबत अतिशय सोप्या भाषेत चांगली माहिती दिली आहे.लेख खूपच आवडला.धन्यवाद.

 4. Subhash Naik

    4 महिन्यांपूर्वी

  Pranayam aani dhyaan yanche mahattwa adhorekhit kele aahe. khup chhan , preranadayee lekh ! - Subhash Naik, Pune. 9158911450

 5. sumitra jadhav

    4 महिन्यांपूर्वी

  सर्वांना समजेल या रीतीने हा महत्वाचा विषय उत्तम रीतीने मांडला आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen