मुंबईच्या रंगीत फुलपाखरांची गोष्ट


अंक : महा अनुभव, जून २०२१ 

एका रविवारी मी आणि आमच्या वर्गातला हरी काळ्याच्या नळीतून दमून घरी आलो. आमच्या घराच्याच बाजूला असलेली पिठाची गिरण उघडी होती. गिरणीच्या उघड्या चौकटीची सावली थेट आमच्या अंगणापर्यंत पसरत पसरत शेवटी विरून गेली होती. अंगात बनियन आणि पायजमा घातलेला गिरणीवाला बाबूकाका गिरणीचा लांबसर पट्टा खाली काढून काही तरी खटपट करत होता. आमच्या घराच्या ओढ्यावर माझे चुलते बसलेले होते. मला कळेना, मोठ्याबाबा अंधार पडल्यावर आज अचानक गावात कसा आला?

माझ्या खांद्यावर हात टाकत मोठ्याबाबा मला म्हणाला, ‘‘काय पैलवान! काय म्हणतेय शाळा?’’ मी गप बसून राहिलो. मागच्या वर्षी मी नववीत नापास झालोय, ही गोष्ट मोठ्याबाबाला अजून माहीतच नव्हती. हरी मोठ्याबाबासमोरच खिशातली बोरं काढून खाऊ लागला, तेव्हा मोठ्याबाबा म्हणाला, ‘‘मग आज दिवसभर बोरं खायची मज्जा केली का?’’ मी मोठ्याबाबाकडे पाहून नुसताच हसलो. मी आणि हरीने दिवसभर आंबट-गोड बोरं खाऊन खाऊन दात आंबून टाकले होते. पाणी पितानाही माझे दात सळसळत होते. घरात वडील टेबलवर चादर टाकून त्यांच्या कपड्यांना इस्त्री करत होते. आई भाकरीसाठी बाजरीचं पीठ मळत होती. मळलेलं पीठ बाजूला ठेवून आईने मोठ्याबाबासाठी चहा केला. आमची शेळी गाभण असल्यामुळे आम्ही कोराच चहा पीत होतो. माझ्या बशीतला कोरा चहा हरीने दोन फुरक्यांतच पिऊन टाकला. हातातली बशी खाली ठेवून हरी घरी निघून गेला. मी कपातला चहा घोट घोट पीत होतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव , जून २०२१ , पर्यावरण

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      3 महिन्यांपूर्वी

    वा. वस्तुस्थिती कल्पनेपेक्षा सुंदर असते. सहज सोप लिखान.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen