अमल्या


अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१

तुमच्याशी कोणतंही साम्य नसलेला कोणी मित्र आहे तुमचा? माझा आहे. अमल्या त्याचं नाव. म्हणजे अर्थात नाव अमोल आहे, पण आता मित्र म्हटल्यावर अमल्या!

कुठल्याशा नाटकाच्या प्रॅक्टिसला हे  तरतरीत, तरणंताठं,  पोरगं  आलं; रंगमंचावर काही फार उजेड पडला नाही त्याचा, पण दोस्ती होऊन गेली. ती अगदी घट्ट झाली ती त्याच्या हॉटेलातल्या मिसळीचा पहिला घास घेतला तेव्हा. दीर्घकाळ जिभेवर  रेंगळणारी चव आणि व्यसन लागेल असा झटका. मिसळ कसली अंमली पदार्थच तो. मिसळही अंमली आणि अमल्याही अंमली.

सक्काळच्या पहिल्याच गिर्‍हाइकाला फडका मारून बसायचा इशारा करता करता अमल्या म्हणणार, “जरा गाडीची किल्ली द्या की, कोपर्‍यावर जाऊन पाव घेऊन आलोच.” हे गिर्‍हाइक म्हणजे अमल्याचाच कोणी मित्र असणार. पाव, फरसाण, कांदा, चहा पावडर, दूध अशा याच्या फेर्‍या चालू. अमल्याला गाड्यांचा तोटा नाही. सगळ्या जगाशी याची मैत्री. तशी ती माझ्याशीही झाली. का झाली, का टिकली हे आता फारसं आठवतही नाही.  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंक : महा अनुभव , ऑक्टोबर २०२१ , व्यक्ती विशेष , ललित

प्रतिक्रिया

  1. SHIVAJI BHADANE

      3 महिन्यांपूर्वी

    खुपच सुंदर लेख! हा लेख मी डॉ अभ्यंकर गेल्यानंतर आज प्रथम वाचला. आज अमल्या असला तर डॉ गेल्यावर सगळ्याय मोठा हंबरडा त्याने फोडला असेल. आज डॉ अभ्यंकर आणि अमल्या दोघांना सलाम.

  2. निशिकांत tendulkar

      4 वर्षांपूर्वी

    राजकिय फोडणी जराशी फसली. बाकी अमल्या आंबटगोड. खमंग मिसळीसारखा.

  3. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    apratim



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen