चित्रस्मृती
हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट 'वक्त'
दिग्दर्शक यश चोप्रा म्हटलं की 'रोमान्सचा बादशहा ' अशी प्रतिमा पटकन डोळ्यासमोर येते आणि लगेचच त्यांच्या 'सिलसिला ', 'चांदनी ', 'लम्हे ' , 'दिल तो पागल है ' अशा प्रेमपटांची नावे पटकन सांगता येतात. पण यश चोप्रा यांचे सर्वोत्तम दिग्दर्शन कसब अथवा कौशल्य सांगायचे तर 'वक्त ' या चित्रपटाचा खास उल्लेख हवाच. एक तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मल्टी स्टार कास्ट मनोरंजक मसालेदार चित्रपट आहे. याचे कारण म्हणजे तोपर्यंत हिंदी चित्रपटात एक अथवा दोन नायकांचे चित्रपट ( उदाहरणार्थ 'संगम ' १९६४) निर्माण होत, पण यश चोप्रा यांनी 'वक्त 'मध्ये चार नायक म्हणजे बलराज साहनी, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर असे चार नायक आणि इंद्राणी मुखर्जी, साधना, शर्मिला टागोर या नायिका असा मल्टी स्टार कास्ट योग आणला. अशा वेळी या स्टार्सची इमेज, कार्यशैली , लोकप्रिय उपयोगात आणायची असेल तर पटकथा आणि संवादही तसेच हवेत. या चित्रपटात तीन भाऊ लहान असताना आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने या कुटुंबाची वाताहत होते आणि सर्व कुटुंब विस्कळीत होते. एकमेकांपासून दूरावतात आणि या चित्रपटाची गोष्ट अनेक वळणे घेत घेत घडत जाते. त्यात काही टर्न आणि ट्वीस्ट म्हणजे हा भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट होय. २८ जुलै १९६५ रोजी 'वक्त ' रिलीज झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपर हिट झाला. आणि नाझ चित्रपटगृहात त्याने तब्बल पंचवीस आठवडे मुक्काम केला आणि त्यानंतर असे दोन अथवा तीन भाऊ लहा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .