वेब सिरीज या माध्यमाचे मूल्यमापन आणि वस्तुनिष्ठता!


वेब सिरीज या माध्यमाचे मूल्यमापन आणि वस्तुनिष्ठता!

तुम्ही नुकतीच एखादी वेब सिरीज पाहून संपवली आहे का? तुम्हाला प्रचंड जबरदस्त भावनानुभव आलाय का? काहींना तर आता आपण जीवनात काय करावं? असा तात्पुरता एक्जीसटेनशिअल क्रायसेस निर्माण करणारा प्रश्न पडला असेल! गंमत आहे आपण सिनेमे तर खूप आधी पासून पाहत आलोय! नाही म्हटलं तरी भारतीय टीव्ही सुद्धा कळत नकळत अनेक वर्ष कन्ज्युम करत आले आहोत! पण कधीच असा प्रश्न समोर येत नसावा! सिनेमावर लिहताना, एखाद्या सिनेमाचे मूल्यमापन करताना आपल्या मनात ठोस अशी मतं असतात. हा ठोसपणा स्टार्स आणि रेटिंगच्या पलीकडे आपल्या मनात अगदी नेमका आणि निश्चित असतो. कदाचित कधीकधी आपल्याला तो दुसऱ्याला समजावता येणार नाही, पण आपल्यापुरता तरी तो आपल्याला ठाऊक असतो! याच्या उलट वेब शो, सिरीज या मध्यमाबद्दल आपल्या मनात ठोस अशी वस्तुनिष्ठता नसते. इथे आपला भावनानुभव सर्वव्यापी झालेला असतो! ही बाब चांगली की वाईट हे बाजूला ठेऊन थोड्या वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून याकडे पाहूया! प्रथम आपण सिनेमा कसा पाहतो आणि सिरीज कश्या पाहतो यातला फरक मांडून पाहू. सिनेमा सहसा आपण सलग पाहतो (अर्थात मध्यांतर असला तरी), त्या सिनेमाबद्दल थोडीफार जुजबी माहिती आपल्याला आधीच आलेली असते तरीही त्या सिनेमातल्या, कथानकातल्या विश्वाशी आपण अनोळखीच असतो. सिनेमा सुरु झाला की अर्ध्या पाऊण तासात आपण त्या विश्वाशी परिचित होत असतो. आपली आकलनशक्ती कथानक, त्याचं विश्व, त्यातली पात्रं सर्व गोष्टींवर एकाच वेळी काम करत असते. कुठल्या एका गोष्टीवर विशिष्टरित्या आपण अभावितपणे लक्ष देत नाही. त्यामुळे सिनेमाचा भावनिक परिणाम आपल्यावर फार झाला तरी आपल्या कलात्मक वस्तुनिष्ठेला सहसा ठेच लागत नाही! इथे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वेब सिरिज

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen