चित्रस्मृती
'सात हिन्दुस्तानी 'चा काळ....
के. ए. अब्बास दिग्दर्शित 'सात हिन्दुस्तानी ' ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) ला पन्नास वर्षे पूर्ण झाली तरी अमिताभ बच्चन नावाचा प्रचंड उर्जा असलेला कलाकार अधिकाधिक नियोजनपूर्वक व संयमाने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवत चाललाय यापासून कोणत्याही क्षेत्रात करियर करु इच्छिणारे खूप काही शिकू शकतात.... फक्त सकारात्मक दृष्टिकोन हवा. अमिताभचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी एकूणच वातावरण कसे होते? तेही जाणून घेणे महत्वाचे... मुंबईत शिवसेना रुजत होती. बेळगाव कारवार सीमा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी शिवसेनेने केलेले आंदोलन अगदी जोशपूर्ण होते. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे बिल लाॅरीच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांसाठी भारतात आगमन झाले होते. मन्सूर अली खान पतौडीसोबतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत होता. गंमत म्हणजे त्या काळात भारतीय संघाने सामना अनिर्णित ठेवला तरी क्रिकेट शौकिनाना आनंद होई. एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर हाच चित्रपट पाहण्याचा एकमेव मार्ग होता. मेन थिएटर ( विशेषतः दक्षिण मुंबईतील), दिवसा तीन खेळ, तर मॅटीनी शोला जुने चित्रपट असा प्रकार होता. तेव्हा श्रीगणेशोत्सव आणि इतर सण अथवा बारसे वगैरेला गल्ली चित्रपट पाह्यची विलक्षण क्रेझ होती. मध्यमवर्गीय कुटुंबात रेडिओ आणला तरी चाळीत पेढे वाटले जात. मुंबई आकाशवाणीवर मराठी भावगीते, चित्रपट गीते, संध्याकाळी सातच्या बातम्या, विविध भारतीवर फौजी भाईओ की पसंद, कोहिनूर गीत गुंजार, रेडिओ सिलोनवर प्रत्येक बुधवारी बिनाका गीतमाला आणि कसोटी क्रिकेटचे समालोचन अगदी कान देऊन ऐकणे यात खूपच आनंद मिळे.हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-11-08 11:00:52