आशुतोष गोवारीकर या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा बहु चर्चित आणि बहु प्रतिक्षित सिनेमा ' पानिपत ' . केंद्रात झालेला सत्ता बदल असेल किंवा अजुन काही इतर कारणे असतील पण २०१४ नंतर उघडपणे बॉलीवूड भारतीय इतिहासावर सिनेमे बनवत आहे आणि त्यातही बहुसंख्य हिंदू अस्मिता असलेले विषय घेऊन बनवत आहे हे निरीक्षण इथे करणे महत्त्वाचे वाटते. बाजीराव - मस्तानी, पद्मावत किंवा आता येऊ घातलेला पानिपत ही साखळी हळूहळू पुढे जाईल हे देखील शुद्ध व्यावसायिक सत्य आहे. पण हे सिनेमे जे फक्त आणि फक्त इतिहासावर आधारलेले आहेत त्यांबाबत तरी वास्तविकता हीच मूळ आधार आहे का या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही इतकचं आहे.इतिहास, सिनेमा आणि कलात्मक स्वातंत्र्य : एक निरीक्षण ..
इतिहासावर सिनेमा बनवत असताना कलात्मक स्वातंत्र्य म्हणून केले जाणारे बदल हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. बॉलीवूड सारख्या संपूर्ण व्यावसायिक इंडस्ट्री मध्ये जिथे व्यावसायिक गणितासाठी कथा - पटकथा यांना बाजूला ठेवले जाते अशात मूळ किंवा वास्तविक इतिहास किंवा घटना यावर संपूर्णपणे आधारलेला सिनेमा यावा ही अपेक्षा अर्थातच अवास्तव म्हणावी लागेल. एखाद्या पात्राची अगदी काल्पनिकपणे केलेली रचना किंवा एखाद्या पात्राच्या जीवनात नसलेले प्रसंग दाखवणे ते संपूर्ण बदलेला इतिहास दाखवणे असे कुठलेही बदल या कलात्मक स्वातंत्र्य खाली खपावता येतात आणि खपवले गेलेले आहेत. मागे वळून चित्रपट सृष्टीचा इतिहास बघता अशी अनेक उदाहरणे आढळून येतात पण गेल्या काही काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हे बदल त्यांच्या चांगला आणि वाईट अशा दोन्ही बाजूंसह आपल्या समोर येत आहेत. यावेळी निमित्त ठरलं ते आशुतोष गोवा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .