सत्यजित राय


जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.   - The raw material of the cinema is life itself. It is incredible that a country which has inspired so much painting and music and poetry  should fail to move the filmmaker. He only has to keep his eyes and ears open. Let him do so…. (Satyajit Ray...1948…What is wrong with the Indian films, published in The Statesman, an english daily) भारतीय सिनेमाची जागतिक पटलावर नोंद का घेतली जात नाही या विषयावर सत्यजित राय यांनी १९४८ साली मांडलेलं हे मत आहे. भारतीय संस्कृती ज्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असेल अशा चित्रपटाचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी आपले चित्रपट भारतीय समाज जीवनातून फुलायला हवेत हे ही त्यांनी जाणलं. आज राय यांचे चित्रपट पाहताना आपल्या समाजभानाच्या विचारांशी ते पूर्णपणे प्रामाणिक राहिले याची आपल्याला खातरी पटते. पाथेर पांचालीपासून ते आगंतुकपर्यंतच्या सर्व चित्रपटांत त्यांनी भारतीय समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा, स्तरांचा, प्रश्नांचा सतत विचार केला आहे हे आपल्याला जाणवतं. पाथेर पांचालीमध्ये बंगालचं ग्रामीण जीवन आपल्यासमोर येतं. तर महानगर, देवी आणि चारुलता या चित्रपटांतून  स्त्रियांचं समाजातील स्थान, त्यांचे प्रश्न आपल्याला भिडतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना आपल्या कलाकृतीतून प्रतिक्रिया देणाऱ्या राय यांनी सत्त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. rmjadhav

      5 वर्षांपूर्वी

    रे साहेबांच्या या तीन चित्रपटानबाबत हे विश्लेषण सुंदर, छान. तीन ही चित्रपट नक्कीच पाहणारच.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen