दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा देणार आहोत. त्यात गॉसिप नसेल. असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिस्कील मल्लीनाथी-हिंदी चित्रपटसृष्टीचित्रपट पडायलाही हवेत...
दिलीप ठाकूरखरं तर सगळेच चित्रपट लोकप्रिय , फिल्मी भाषेत सुपर हिट झाले असते तर एवढा आणि असा ट्रॅफिक जाम झाला असता की, असंख्य चित्रपट कायमचे वेटींग लिस्टवर राहिले असते आणि कंटाळून त्यातील बरेच कायमचे डब्यात गेले असते. पण ज्याप्रमाणे शारीरिक व मानसिक फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी किमान जोरदार संधी आणि काही चिंता अधूनमधून असाव्यातच तसेच अधेमधे चित्रपट पडायलाच हवे. लगेचच, 'ठग्ज ऑफ हिन्दुस्तान ' आणि 'झिरो 'च्या पडल्याने किती कोटी पाण्यात गेले याचा हिशोब आपण करायचा नाही. उलट, हे चित्रपट पाह्यचे टाळल्याने अगणित रसिकांचा पैसा, वेळ आणि कष्ट वाचले असा सकारात्मक विचार आपण करुया....गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक मोठ्ठी घटना ( की दुर्घटना) म्हणजे, एका खूप मोठ्या चित्रपटाच्या वाटेला तसाच मोठा 'झिरो ' आला. आता चित्रपट आपटणे, सभ्य भाषेत सांगायचे तर रसिकांनी चित्रपट नाकारणे हे नवीन नाही. गुरुदत्तचा 'कागज के फूल ', राज कपूरचा 'मेरा नाम जोकर ', शक्ती सामंताचा 'मेहबूबा ', एच. एस. रवैलचा 'दीदार ए यार ' , सतिश कौशिकचा 'रुप की रानी चोरो का राजा '.... पडलेल्या चित्रपटा ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
चित्रपट पडायलाही हवेत...
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-01-15 06:00:25
santoshpathare
6 वर्षांपूर्वीआपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. तुमच्या सूचनेची दखल घेऊ.
jspalnitkar
6 वर्षांपूर्वीदिलीप ठाकूर ह्यांनी मांडलेला विषय इंटरेस्टिंग आहे...काही मुद्दे छान मांडले आहेत.. एक गोष्ट मात्र खटकली... ह्या लेखात मराठी वाक्यरचना, व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत....समाजमाध्यमांवर घाईघाईने लिहिलेल्या 'पोस्ट्स' किंवा प्रतिक्रिया असतात तसं वाटलं वाचताना... (ह्यात 'प्रमाण' भाषा वापरली पाहिजे वगैरे असा मुद्दा नाहीये...."आधुनिक" तसेच परभाषिक शब्द वापरण्यात काहीच गैर नाही....) बहुविध सारख्या मंचावर प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाकडून नक्कीच यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत...असो... बहुविध वर ही कॅटेगरी सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!