‘फोटोग्राफ’ची हवा आणि निवडणुकांचा माहौल


दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा. त्यात गॉसिप नसेल, असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

येत्या शुक्रवारी ‘फोटोग्राफ’चीच हवा

-   गणेश पाटील या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांचा विचार करता हमीद वगळता इतर तीन चित्रपट (फोटोग्राफ, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर, मिलन टॉकीज) हे समीक्षकांनी नावाजलेले आणि आपला ठराविक चाहतावर्ग असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शकांचे आहेत. हासिल आणि पानसिंग तोमरसारखे हार्डहिटिंग चित्रपट देणारे तिगमांशू धुलिया 2013 साली आलेल्या बुलेट राजापासून दर्जात्मकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या घसरत चाललेले आहेत. गेल्यावर्षी आलेल्या 'साहिब, बिवी और गँगस्टर' या आपल्या लोकप्रिय चित्रपटाच्या संजय दत्तची प्रमुख भूमिका असणाऱ्या तिसऱ्या भागातूनही ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्याआधी 2017 मध्ये आलेला रागदेश हाही कधी आला कधी गेला कळलंच नाही.  म्हणूनच की काय मिलन टॉकीजची फार चर्चा आणि प्रमोशनही पाहायला मिळत नाहीये. 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' हा रंग दे बसंती फेम राकेश ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट आहे. मिर्झियाच्या भरभक्कम अपयशानंतर राकेश मेहरा काय नवीन घेऊन येत आहेत याची उत्सुकता आहे. आई मुलाची ह्रदयस्पर्शी कथा असलेला ह्या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेती अंजली पाटील प्रमुख भूमिकेत आहे. आपल्या आईवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मदत मागण्यासाठी एक 8 वर्षाचा मुलगा माननीय पंतप्रधानांना पत्र लिहायचं ठरवतो. येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक ह्या चित्रपटाचं स्वागत कसं करतात हे पाहणं रंजक ठरेल. स्मॉल बजेट आणि स्मॉल स्केल र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen