माणूस सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला तो त्याने निर्माण केलेल्या भाषेमुळे.पण ही भाषा फक्त उच्चारून तो थांबला नाही,तर उच्चारलेले शब्द कायम राहावेत ( निदान काही काळ तरी ..) म्हणून त्याने लेखन सुरू केले.पार आदिम काळातील शिळांपासून ते आजच्या युगातील डिजीटल माध्यमांपर्यंत माणूस लिहीतच आहे,पण तो का लिहितोय आणि काय लिहीतोय ? तो जे लिहीतो त्या मागचा उद्देश सफल झालाय का? टॅबलेट म्हणजे शिळा ते आजचा डिजीटल टॅबलेट असा हा माणसाच्या लेखनाचा प्रवास उलगडला आहे मृणालिनी वनारसे यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकातील ‘टॅबलेट ते टॅबलेट ’या लेखामध्ये. मृणालिनी वनारसे- मृणालिनी वनारसे यांनी पुणे विद्यापीठातून तत्वज्ञान हा विषय घेऊन पारंगत ही पदवी मिळवली आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत तसेच भारतीय विद्या (इंडॉलॉजी) या दोन विषयात देखिल त्यांनी पारंगत पदवी संपादन केलेली आहे. इकॉलॉजीकल सोसायटी या संस्थेचा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोपासनेचा अभासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. गेली सुमारे १६ वर्षे निसर्गशिक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. ओढ्यांच्या नैसर्गिक पुनरुज्जीवनासाठी ‘निर्मल गंगा अभियान’ हा अभिनव उपक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबविला. या प्रकल्पावर आधारित ओढ्यांचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन कसे करावे याविषयी मा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, समाजकारण
, भाषा
, मिळून साऱ्याजणी
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीaavdlaa lekh
krmrkr
6 वर्षांपूर्वीभारीच. साधारण साडेचार हजार वर्ष लेखन मनुष्बयासोबत आहे. मनातले विचार हातातल्या tablet वर उमटणे ही काही वर्षात साध्य होईल. मग हळूहळू लिहणे ही सुटेल.पोस्टअॉफीस शिवाय पत्रव्यवहाराची कल्पना अवघी पन्नास वर्षापुर्वी अशक्यप्राय वाटायची . अगदी तसेच.