कबूल केलेले 'सर्व' झाले...

संपादकीय    किरण भिडे    2019-06-24 10:00:49   

सर्वसमावेशक सभासदत्व नमस्कार, आठवतंय? मागे आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं त्यात विचारलं होतं की बहुविध चे सर्वसमावेशक सभासदत्व असावे की प्रत्येक नियतकालिकाचे स्वतंत्र सभासदत्व असावे असं तुम्हाला वाटतं? साधारण ९०% वाचकांनी एकच सर्वसमावेशक सभासदत्व असावं असा कौल दिला होता. उरलेल्या १०% मध्ये स्वतंत्र सभासदत्व असावं आणि दोन्ही पर्याय असावेत असं वाटणारे वाचक होते. हा निकाल आम्ही जाहीरही केला होता आणि लवकरच यावर काही निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. तर ती वेळ आता आली आहे आणि आपण प्रत्येक नियतकालिकाचे स्वतंत्र सभासदत्व असावेच पण त्यासोबत एक सर्वसमावेशक सभासदत्व पण असावे यासाठी आपले डेव्हलपर विनय सामंत यांना गळ घातली. त्यांनीही तांत्रिकदृष्ट्या ते सिद्ध करून दिलं आणि आता तुम्ही आपल्या website वर जाऊन बघितलंत तर तिथे इतर नियतकालिकासोबत सर्व असा अजून एक पर्याय दिला आहे. तो तुम्ही निवडला  तर तुम्हाला बहुविध वर प्रसिद्ध होणारे सर्वच्या सर्व लेख वाचता येतील. म्हणजे सगळया नियतकालिकांचे मिळून शुल्क १४५० रुपये होते त्याऐवजी फक्त ५०० रुपये भरून वर्षभर आपण हे सर्व लेख वाचू शकतो. म्हणजे चक्क ९५० रुपयांची घसघशीत सूट... आता... ज्या सभासदांनी याआधीच वेगवेगळे पैसे भरून निरनिराळ्या नियतकालिकांचे सभासदत्व घेतले आहे त्यांचे ५०० रुपये वगळून राहिलेले पैसे आम्ही देणं लागतो. ते पैसे एकतर त्यांना परत मिळतील किंवा पुढील वर्षाच्या सभासदत्वासाठी वापरता येतील. किंवा त्या पैशातून अन्य कुणाला सर्व चे सभासदत्व तुम्ही भेटही देऊ शकता. त्यासाठी कृपया याच नंबरवर आमच्याशी संपर्क साधून आपला निर्णय आम्हाला कळवावा. ज्या सभासदांचे सभासदत्व सुरु आहे त्यांना उरलेले पैसे ( ५०० वजा तुम्ही याआधीच भरलेले पैसे ) भरून सर्व चे सभासद होता येईल. आणि गंमत म्हणजे हे सभासदत्व आता पुढच्या जून पर्यंत राहील. इच्छुकांनी याच नंबरवर आमच्याशी संपर्क साधावा. हे पैसे कसे भरायचे तेही आम्ही सांगू. ज्या सभासदांचे सभासदत्व याआधीच संपले आहे ते login करून सर्व हा पर्याय निवडू शकतात. online पैसे भरून सभासदत्व नुतनीकरण पण त्यातच होऊन जाईल. याविषयी कोणालाही काहीही शंका/अडचण असेल तर याच whatsapp क्रमांकावर आम्हाला विचारा. बहुविध चे ios app आता उपलब्ध झाले आहे... कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे आणि मनात समाधानाची भावना आहे. कित्येक दिवसांपासून आम्ही तुम्हाला सांगत होतो 'होतंय.. होतंय' म्हणून पण देत मात्र नव्हतो ते apple फोन्स आणि ipad साठी लागणारे ios app आता apple app  store वर उपलब्ध झाले आहे. त्याची लिंक खाली देत आहे. नुसते सर्च करून दिसले नाही तर या लिंकवरून जा. हळूहळू install करणाऱ्यांची संख्या वाढेल तसे ते सर्च मधेही दिसेल अशी अपेक्षा आहे. कृपया हे app install करून पहा आणि काही अडचण आली तर कळवा. https://apps.apple.com/app/id1467748001


प्रतिक्रिया

 1. sushama

    9 महिन्यांपूर्वी

  सर्व चे सभासदत्व घेतले असले, तरी मला पुनश्च वरचे लेख वाचता येत नाहीत.. आणि ते लेख बहुविध वर नसतात.. कसे करावे?

 2. किरण भिडे

    10 महिन्यांपूर्वी

  9152255235 या क्रमांकावर स्क्रीन शॉट पाठवा.

 3. sushama

    10 महिन्यांपूर्वी

  माझे सभासदत्व 'सर्वं 'असूनही मला पुनश्च चे नियतकालिक लेख वाचता येत नाहीत..

 4. किरण भिडे

    2 वर्षांपूर्वी

  हो नक्कीच. ९१५२२५५२३५ या क्रमांकावर संपर्क साधा.

 5. Rahulmuli

    2 वर्षांपूर्वी

  मी २ महिन्यापुर्वी पुनश्च सभासदत्व घेतले आहे. मला सर्वसमावेशक सभासद होता येईल काय?

 6. ssaptarshi

    2 वर्षांपूर्वी

  धन्यवाद !!

 7. avinashjee

    2 वर्षांपूर्वी

  धन्यवाद !

 8. SunilJoshi

    2 वर्षांपूर्वी

  आत्ताच केले. पहिल्याच सर्च वर दिसते आहे. काहीही त्रास न होता इन्स्टाॅल झाले. धन्यवाद.

 9. milindKolatkar

    2 वर्षांपूर्वी

  मी त्या ९०% पैकी… धन्यवाद! ? आपली स्फर्धा आमच्या झोपेशी…?वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.