अंक : जडण-घडण मे २०२१
‘वैयक्तिक अनुभवावर आधारित कवितातून वैश्विक आणि कालातीत परिमाणाची अनुभूती देणारी कवयित्री.’
नोबेल समितीने २०२० सालाचा साहित्य पुरस्कार अमेरिकन कवयित्री श्रीमती लुईस ग्लीक यांना जाहीर करताना वरील चपखल शब्दात तिच्या काव्याचं मर्म उलगडून दाखवलेलं आहे. कविता आणि आपली काव्यविषयक भूमिका, कवितेबद्दलचे विचार मांडणारे निबंध या दोन लेखनप्रकारात श्रीमती ग्लीक यांचं लेखन सीमित आहे. येल विद्यापीठात साहित्याच्या विद्यार्थ्यांना शिकवणं अन् इतर अनेक ठिकाणी काव्यविषयक व्याख्यानं देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेली ७७ वर्षाची ही कवयित्री जीवनाच्या अनेक चढउतारातून गेलेली आहे. जे वाट्याला आलं ते आपले वैयक्तिक अनुभव मांडताना प्राचीन ग्रीक आणि रोमन मिथकातील प्रतिमा वापरणं.. अन् या अनुभवांना वैश्विक तसेच सार्वकालिक परिमाण देणं ही तिच्या काव्याची मर्मस्थानं अन् वैशिष्ट्ये आहेत असे तिचं समीक्षक म्हणतात. म्हणूनच ते समकालीन काव्यापेक्षा वेगळं अन् अधिक परिणामकारी आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
@ आत्माराम जगदाळे... "आटोपशीर" शब्द आवडला.. "थोडक्यात" पेक्षा जास्त चपखल आहे..
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच सुंदर लेख लिहिला आहे . एखाद्या व्यवतीचा ' त्याच्या साहित्य कृतीचा ' कार्य कर्तृत्वाचा आटोपशीर आणि वाचनीय परिचय कसा असावा याचं उत्तम उदाहरण .