अंक : जडण घडण मे २०२१
१ मे २०२१ ला आपलं महाराष्ट्र राज्य वयाची साठी पूर्ण करत आहे. एक राज्य म्हणून गेली साठ वर्ष भाषा, संस्कृती, प्रशासन, कायदे या सर्वांना एक निश्चित चौकट मिळाली, इथल्या माणसांना 'महाराष्ट्रीयन' अशी एक ओळख मिळाली. इथला भूगोल, इथल्या नद्या, इथले डोंगर कागदोपत्री का असेना, एका विशिष्ट सीमेत बंदिस्त झाले. भूगोलाच्या पाठोपाठ इथली जंगलं, इथले समुद्र, इथले पाणवठे आणि त्यात नांदत असलेलं वन्यजीवन या सर्वांवरच 'महाराष्ट्राची वनसंपदा, महाराष्ट्राची जलसंपदा, महाराष्ट्राची जैवविविधता' असं शिक्कामोर्तब झालं. साठ वर्षांत माणसांच्या पिढ्या बदलल्या, जगण्याच्या पद्धती बदलल्या, गावांची शहरं आणि शहरांची महानगरं झाली. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं वेगवेगळी वळणं घेत राहिलं. निसर्गभान जपताना 'वसुधैव कुटुम्बकम्' या तत्त्वाला स्मरून माणूस आणि निसर्गाचं वैश्विक नातं जपणं आणि आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि अगदी आपल्या गावात अस्तित्व टिकवून असणाऱ्या निसर्गाबद्दल सजग राहणं असा बहुपदरी प्रवास अपेक्षित आहे. सहा दशकं पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र राज्याची जैवविविधता किती बहुरंगी, बहुढंगी आहे, माणसांच्या विकासासाठी त्यातल्या कशाचा बळी गेला आहे, काय तग धरून आहे आणि हा वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण काय करणार आहोत या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाद्वारे करूया.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .