एम.पी.एस.स्सी. डायरेक्ट रिक्रुटसचं इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज नाशिकमधलं ट्रेनिंग संपल्यानंतर मला पहिल्या पोस्टिंगची ऑर्डर मिळाली ती पानशेत इथल्या क्वालिटी कंट्रोल सब डिव्हिजनची. क्वालिटी कंट्रोल सबडिव्हिजनला पोस्टिंग मिळाल्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण डायरेक्ट रिक्रूट क्लास-वन अधिकाऱ्यांना पहिलं पोस्टिंग हे वर्किंग सबडिव्हिजनमध्ये द्यावं अशी सर्वसाधारण प्रथा आहे. पण ऑर्डरप्रमाणे हजर होणं मला गरजेचं होतं. त्यानुसार पुण्यातल्या बालभारती भवनमध्ये असलेल्या डिव्हिजनमध्ये मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना भेटायला गेलो. केबिनमध्ये जाऊन माझी ओळख करून दिली आणि माझी ऑर्डर दाखवून मी हजर होतो आहे असं त्यांना सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरची एकही रेषा थोडीदेखील हलली नाही. म्हणजे स्वागताचं हसू नाही किंवा नाराजीच्या आठ्या नाहीत. त्यांनी फक्त मान उडवली आणि ते गप्प बसून राहिले. मग मीही लगेच उठून बाहेर पडलो. मध्यंतरी कोणत्यातरी ऑफिसात हिंगे नावाच्या सिनीअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी गाठ पडली. कुणीतरी माझी ओळख करून देताच त्यांनी दोन वाक्यं उच्चारली. पहिलं वाक्य म्हणजे पूर्वीच्या काळी डायरेक्ट रिक्रुट ऑफिसरच्या चेहऱ्यावर एक स्पार्क दिसायचा, पण हल्लीचे डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर मेंगळट दिसतात. आणि दुसरं वाक्य, तू पण मोडक का? पूर्वी एक मोडक तिथे जाऊन फार वाळू चाळायला लागला. त्यामुळे लगेच त्याला तिथून बदलला, आता तू तिथे जाऊन फार वाळू चाळू नकोस. त्यांची दोन्ही वाक्य अनावश्यक होती. पण काही माणसांचे स्वभाव तसे असतात त्याला काय करणार? मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .