दूरस्थ कलाशिक्षण


अंक : जडण- घडण , जून २०२१

आपली जडणघडणच अशी झाली आहे की कितीही संकटं, आपत्ती येवोत आपण त्याला बघून सुरुवातीला घाबरतो, नंतर प्रतिकार करतो, थोडंसं हतबल होतोय असं वाटताच नव्याने उठून त्याच्याकडे संधी म्हणून बघायला लागतो. कोरोनाचं अगदी तसंच काहीसं झालं. मार्च २०२० ला आपण घाबरलो, एप्रिल २०२० ला आपापल्या पद्धतीने प्रतिकार केला, मे महिन्यात निराशेचे ढग दिसायला लागताच जून महिन्यात आपण कात टाकली आणि नव्या दमाने, जोमाने, इच्छेने सज्ज झालो शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी. एव्हाना झूम, गूगल मीट अंगवळणी पडलं होतं. कारण मे महिन्यातच व्याख्याने, कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने करून बघितल्या होत्या. अगदी छे बुवा ! आम्ही नाही मोबाईल वापरत किंवा फक्त बोलण्यासाठी त्याचा उपयोग ... तासन् तास हातात कशाला हवा असे म्हणणारे सुद्धा या पद्धतींना सरावले होते. काळाचा महिमा दुसरं काय? आता दूरस्थ पद्धतीने शिक्षण याकडे ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आव्हान म्हणून बघत होतं. आपली शिक्षणपद्धती बदलू पहात आहे. त्याचीच ही नांदी समजूया. निव्वळ परीक्षार्थी - गुणार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी ज्ञानार्थी कसे घडतील हे पाहूया.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण-घडण , शिक्षण

प्रतिक्रिया

  1. मेघना जाधव

      3 वर्षांपूर्वी

    व्वा फारच छान लेख, एक सकारात्मक पैलू उलगडा.

  2. Prakash Khanzode

      3 वर्षांपूर्वी

    वा, खरंच शक्य आहे! आता नवीन वाटा आणि पद्धती शोधाव्याच लागणार. त्यात नवीन संधीसुद्धा दडलेल्या असतील :)



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen