अंक : जडण-घडण, जून २०२१
सदर : कोयना काठ भाग १० उत्तरार्धदिवाळीच्या सुट्टीनंतर कंपनीने सीझन सुरू करायचं फार मोठं फंशन साजरं केलं. स्वतः सचिव गांधी साहेब, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता आले होते. वरसगाव आणि पानशेत या दोन धरणांच्या बरोबर मधे टेकडीवर विश्रामगृह बांधून, त्याची खूप देखणी अंतर्गत सजावट केली होती. तिथे मोठी पार्टी झाली. पण एझियुटिव्ह इंजिनिअरच्या खाली कोणालाही निमंत्रण नव्हतं. एकूणच कंपनीच्या लेखी आम्हाला काय किंमत आहे, याची अतिशय कडवट जाणीव तेव्हा आम्हा सर्वांनाच झाली.
...
दुसर्या दिवशी सकाळी उठून सारे वरिष्ठ आपापल्या गावी निघून गेले, आणि साईटवर पीस वर्कर आणि मजुरांचे मोठमोठे तांडे निरनिराळ्या मोनोलिथवर धडाडीने कामाला लागले. कामाच्या पहिल्याच दिवशी निकम साहेब मला सांडव्याच्या मोनोलिथ वर घेऊन गेले. गेल्या सीझनचा सर्वात वरचा थर हातोडीने ठोकून कसा तपासायचा, त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मला दाखवलं. म्हणजे हाताने हलणारे दगड प्रथम काढायचे. नंतर उरलेल्या प्रत्येक दगडावर हातोडीने ठोकल्यावर पोकळ आवाज देणारे दगड देखील पहारीने टोकरून कसे काढायचे, ते मी नीट समजून घेतलं. याप्रमाणे मधल्या पाचही मोनोलिथच्या वरच्या थराची तपासणी करून त्यांची साफसफाई करून नंतर तारेच्या ब्रशने ते धुवायचे आणि हवा आणि पाण्याच्या प्रेशरजेटने धुऊन त्यावरील धूळ काढून तो कसा स्वच्छ करायचा हेही मी नीट समजून घेतलं. माझे सगळे कनिष्ठअभियंता त्यांच्या त्यांच्या कामाला लागले
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Arvind Joshi
4 वर्षांपूर्वीwhat happend next?