‘द लूमिनरीझ्’ (नक्षत्रप्रभावंत) : एलिनर कॅटन (सदर - मानाचे पान)


अंक: ललित, एप्रिल-मे- जून २०२० न्यूझीलंडच्या सांस्कृतिक इतिहासाचे महाकाव्याच्या तोडीचे वाङ्मयीन प्रारूप कथात्मरूपात मांडणारी एलिनर कॅटनची एक अजरामर साहित्यकृती म्हणून गाजत असलेली ‘द लूमिनरीझ’ ही कादंबरी आता मराठीत अनुवादित झाली आहे. २०१३ सालचे ५० हजार पौंडाचे मॅनबुकर पारितोषिक पटकावणारी ही कादंबरी कॅटनने लिहिलेली दुसरी कादंबरी असली तरी ते प्रख्यात मानांकन मिळवणारी ही न्यूझीलंडची पहिली वाङ्मयीन कलाकृती ठरली आहे. ८५० पृष्ठांची ही महाकादंबरी न्यूझीलंडच्या सुवर्णसाठा असलेल्या प्रदेशात १८६५-६६ च्या दरम्यान होकिटिका येथे घडणारी एक अद्भुत म्हणावी अशी नाट्यमय कथा मांडताना एखादी ऐतिहासिक कादंबरी वाटावी अशा थाटात न्यूझीलंडचा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वारसा वाचकांसमोर उलगडत जाते. कादंबरीतील घटना १९व्या शतकातील मध्यावधी कालखंडात घडत असल्याने त्या वास्तववादी आणि कालसदृश वाटाव्यात म्हणून एलिनर कॅटन वरकरणी जरी व्हिक्टोरियन कालखंडातील समकालीन ब्रिटिश कादंबरीकार चार्ल्स डिकिन्स, जॉर्ज इलियट, ब्रॉन्टे भगिनी आदि मान्यवर लेखकांची निवेदन पद्धती आणि भाषा या कादंबरीसाठी वापरताना दिसत असली तरी त्यास नाविन्यपूर्ण कथात्मशैलीची जोड देऊन लेखिका एक ‘उत्तर-आधुनिक’ कलाकृती वाचकांसमोर पेश करते, हे या कादंबरीचे वेगळेपण आहे. त्यामुळेच आजच्या २१व्या शतकातील कादंबरी जगतात अद्भुत ठरावी अशी गुंतागुंत वाढविणारी ‘राशोमान’ पद्धतीची कथात्म शैली लेखिका वापरते आणि घटनाक्रमातील चक्रव्यूहातून समाधानकारक उकल होईपर्यंत वाचकाला हळुवारपणे बाहेर काढून उत्कंठा टिकवित त्याला कथेच्या शेवटापर्यंत सहजी नेऊन पोहचवते. हे तंत्र ती इतक्या कौशल्याने हाताळते की ते वाचकाला कळूही शक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen