ललित, दिवाळी अंक २०२०
2018 साल हे नोबेल अकादमीसाठी नामुष्कीचे होते. निवडसमितीतील सदस्यांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या फैरी झडू लागल्या. ‘मी टू’ ही मोहीम जोरात होती. नोबेल अकादमीच्या सदस्यांना डच्चू द्यावा लागला. वास्तविक हे सदस्य आजन्म सभासद असतात पण त्या अभूतपूर्व बदनामीमुळे त्यांना काढून टाकले गेले आणि त्यावर्षीचा पारितोषिकाचा समारंभ रद्द केला गेला. पण त्यावर्षीचे विजेते आणि २०१९चे विजेते मिळून पारितोषिके जाहीर झाली. त्यात २०१८ ची साहित्य पारितोषिकाची मानकरी होती पोलंडची ओल्गा टोकरझुक. एका मध्यमवर्गीय शिक्षक मात्यापित्यांची ही कन्या. तिचा जन्म २ जानेवारी १९६२ला कलेचॉव्ह, पोलंड येथे झाला. वडील शाळेत शिकवत तसेच वाचनालय प्रमुख म्हणूनही काम पाहत असत. बालपणीच ओल्गाला वाचनाची आवड लागली. झपाटल्यासारखी ती वाचत बसे. तिला खास करून मिथक कथांचे आकर्षण होते. त्याचाच वापर तिने मानवी वर्तणुकीचा अभ्यास मांडताना केलाय. मानसशास्त्र विषय घेऊन तिने वॉर्सा विद्यापीठातून पदवी घेतली. वयाच्या २३व्या वर्षी तिने रोमन ङ्गिनगासशी विवाह केला पण तो फार काळ टिकला नाही. त्याच्यापासून तिला एक मुलगा आहे, झिबिग्न्यू. आता तिने दुसरा विवाह झॅगोझ झायगॅडिओशी केलाय नि ते दोघे पोलंडमध्ये एका छोट्याशा खेड्यात राहतात. पोलंड येथील राजकीय स्थितीबद्दल, बदलाच्या दिशेने सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग आपल्या लेखनातून ती दाखवत असते. आपल्या देशातील समृद्ध पुरातन संस्कृती, वाङ्मय, परंपरा, मिथकं यांचा वारसा ती लोकांसमोर ठेवते. तिच्या मते युरोपातील ह्या प्रदेशाबद्दल इतर युरोपियनांना नीट पुरेशी माहिती नाहीय.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .