मराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे


ललित, दिवाळी अंक २०२०

मराठी साहित्यात अनुवादाच्या माध्यमातून इतर भाषांमधल्या साहित्यकृतींची भर मोठ्या प्रमाणावर पडत असते, याची मराठी वाचकवर्गाला कल्पना असते. मात्र मराठीतील काही महत्त्वाच्या साहित्यकृती हिंदी भाषेत अनुवादित करण्याचे काम गेली कित्येक वर्षे निष्ठापूर्वक करणारे डॉ. दामोदर खडसे मराठी वाचकांना माहीत असण्याची शक्यता गृहीत धरता येत नाही. त्यासाठीच डॉ. खडसे यांच्या अनुवादकार्याची दखल घेणे गरजेचे वाटते. त्यांना अनुवादासाठीचा ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला आहे, याचाही गौरवपूर्वक उल्लेख करणे अगत्याचे ठरते.

डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1948 ला मध्यप्रदेशातल्या सरगुजा जिल्ह्यातल्या छोट्याशा आदिवासी गावात झाला. त्या भागात छत्तीसगढी भाषा बोलली जाते. ते शाळेत हिंदी शिकले. त्यांची मातृभाषा मराठी असल्यामुळे घरातल्या संस्कारांमुळे मराठीही शिकले. मातृभाषा मराठी असूनही ते परिसरातील भाषिक प्रभावामुळे हिंदीभाषक झाले. आजही ते हिंदीतून साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांनी कविता, कथा, कादंबर्‍या अशा प्रकारचे लेखन हिंदीतून केले असून ते मान्यताप्राप्त ठरले आहे. त्याचबरोबर मराठीतील निवडक साहित्यकृतींचा हिंदीतून अनुवाद करण्याचे त्यांचे कार्यही सातत्याने चालू आहे. त्यांच्या अनुवादकार्याचा व्याप मोठा आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , दिवाळी अंक २०२० , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Jayashree Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    मा.. निलीमा गुंडी यांचे आभार.डाक्टर खडसेंबद्दल माहिती करुन दिली या बद्दल.लेख विलक्षण वाचनीय असा झाला आहे.

  2. Jayashree Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    मा.. निलीमा गुंडी यांचे आभार.डाक्टर खडसेंबद्दल माहिती करुन दिली या बद्दल.लेख विलक्षण वाचनीय असा झाला आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen