अंक : ललित दिवाळी २०२०
फणीश्वरनाथ रेणु हे हिंदीतले ज्येष्ठ साहित्यिक माहीत झाले, ते ‘तिसरी कसम’ ऊर्फ ‘मारे गए गुलफाम’ अशा शीर्षकाने. शिवाय कुठेतरी वाचलेही होते, की हे बिहार प्रांतातल्या ग्रामीण भाषेतले प्रमुख लेखक. एवढंच. कथा वाचण्यात नव्हती. आणि ‘तिसरी कसम’ पाहिला, तेव्हा या कथेबद्दल कुतूहल वाटू लागले. हिंदीतल्या इतर लेखकांच्या बर्याच कथा त्यानंतर वाचण्यात आल्या, पण का कोण जाणे रेणु यांच्या कथा वाचायला जमल्या नाहीत. दरम्यान सर्वश्रेष्ठ हिंदी कथांचं संपादन पाहताना त्यातल्या ‘लालपान की बेगम’ आणि ‘रसप्रिया’ या कथा वाचण्याचा प्रयत्न केला. अर्थात पहिली अडचण आली, ती बिहारच्या त्या ग्रामीण भाषेची. आणि अर्धवट, पकड न घेणार्या त्या कथा तशाच राहिल्या होत्या; आता नव्याने वाचणार आहे. ‘तिसरी कसम’च्या दुसर्या नावाचेही असेच झाले- ‘मारे गए गुलफाम’ याचा ना अर्थ समजला होता ना प्रयोजन. सिनेमा पाहिल्यावर त्यातले. ‘मारे गए गुलफाम, अजी हां मारे गए गुलफाम..’ हे गाणे ओळखीचे झाले, आवडू लागले, पण या गुलफामचा पत्ता लागला नाही, अर्थ लागला नाही. हिंदी सिनेगीतांत हा शब्द आणखी एका गाण्यात आलेला आहे, ‘कोहिनूर’मधले ते युगल गीत- ‘कोई प्यार की देखे जादूगरी, गुलफाम को मिल गयी सब्जपरी!’ (हिंदी सिनेगीतांतले अनेक शब्द असे-दिवाणी दाव्याच्या प्रकरणासारखे कितीही दिवस तसेच पडून असतात. एकदा मागेच लागलो, आणि दोन्ही शब्दांचा छडा लावून टाकलाः गुलफाम म्हणजे, गुलाबी रंगाचा, देखणा पुरुष (किंवा स्त्री) आणि सब्जपरी म्हणजे, मदिरा, मदिराक्षी! पण हे झाले शब्दकोशातले अर्थ. इथे गुलफामचा अर्थ स्वभावाने कोमल व्यक्ती आणि सब्जपरी म्हणजे स्वप्नपरी-अशी परी जी मिळणे शक्य नाही! मारे गए गुलफाम म्हणजे, सुंदरता पाहून भाबड्या माणसाचे भान हरवले!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rajiv Kulkarni
4 वर्षांपूर्वीराजकपूर गेले तेव्हा टीव्ही वर दूरदर्शन वर हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट दाखवला गेला... त्याची जादू अजूनही मनावर रुंजी घालते.... सुंदर गाणी अप्रतिम संगीत, लाजवाब अभिनय आणि रात्रीच्या प्रघाड शांततेत... आ अभि जा... रात ढलने लगी चांद झुकने चला... पान खायो सैया हमारो.. अशी एकाहून एक सरस गाणी... बैलगाडीतला रात्रीचा प्रवास... सब कुछ एक नंबर 👌👌👌👌👌👌 त्या गोड आठवणी पुनः जाग्या झाल्यात 🙏🙏🙏🙏🙏🙏
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीसुरेख
तिसरी कसम सिनेमा यापूर्वी दोन वेळा पाहिला आहे..पण आता हा लेख वाचल्यावर “तिसरी कसम” पुन्हा एकदा पाहाणार आहे.. निवांतपणे....