‘मराठी प्रथम’ ह्या ई-पत्रिकेचे स्वरूप पाहिल्यावर आपणास कल्पना येईल की हे मराठी भाषेच्या संवर्धनाला, प्रसाराला वाहिलेले नियतकालिक आहे. हे नियतकालिक भाषेच्या अभ्यासकांसाठी जसे आहे तसे भाषेच्या कार्यकर्त्यांसाठीही आहे. वैचारिक, माहितीपर, प्रबोधनात्मक असे त्याचे स्वरूप असून ते सर्व प्रकारच्या मराठी वाचकांसाठी आहे. लेख, वृत्तलेख, वृत्तान्त, माहिती, मुलाखती, गमतीशीर भाषानिरीक्षणे, रेखाटने, चित्रे, छायाचित्रे, व्यंगचित्रे असे त्याचे वैविध्यपूर्ण स्वरूप असणार आहे. मराठीवर नितांत प्रेम करणारे, मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक लोक आहेत. ते सर्व ‘मराठी प्रथम’चे लेखक होऊ शकतात. मराठीबाबतच नव्हे तर एकूणच भारतीय भाषांबाबत जे काही सकारात्मक, नकारात्मक घडते आहे त्याची नोंद ‘मराठी प्रथम’ घेऊ इच्छिते. त्यासाठी लेखक ह्या नात्याने आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या भागातील मराठी शाळांची, भाषाविषयक उपक्रमांची, अडचणींची माहिती लेख अथवा वृत्तान्त स्वरूपात आम्हांला पाठवू शकता. सोबत छायाचित्रे पाठवता आली तर उत्तमच. ‘मराठी प्रथम’च्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडून घेऊन मराठीच्या संवर्धनाचे, अन्यायनिर्मूलनाचे काम करू शकतो. आपण आमचे लेख वाचून प्रतिक्रिया देऊ शकता, सूचना करू शकता. आपण सर्वांनी मिळून मराठीचा विकास करायचा आहे. म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, मराठी पत्रकार, लेखक यांना आमचे विशेष आवाहन आहे की हे नियतकालिक आपलेच आहे असे समजा आणि आम्हांला लेखनसहकार्य करा. करीत राहा.
ई-साहित ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
arvindjadhav
6 वर्षांपूर्वीलिहायलाच हवे!