मराठीचे मरण अटळ आहे अशी भविष्यवाणी इतिहासाचार्य राजवाडे यांनी अनेक दशकांपूर्वी केली होती. भाषेचा मृत्यू हा केवळ भाषेचा मृत्यू नसतो. तो एका संस्कृतीचा मृत्यू असतो. पिढ्यानपिढ्या साठवलेल्या अनुभवांचा मृत्यू असतो. राजवाड्यांचे भविष्य खोटे करणे कठीण असले तरी अशक्य नाही. आम्ही इच्छा-शक्ती दाखवली तर मराठी किंबहुना कोणतीही भारतीय भाषा टिकवणे अशक्य नाही. पण त्यासाठी ती ज्ञान-भाषा आणि अर्थभाषा (म्हणजे प्रशासकीय कामकाजाची आणि उद्योगधंद्याची भाषा) होणे हा एकमेव मार्ग आहे. इंग्रजीचे स्थान आज चीन, जपान, जर्मनी, रशिया, इ. देशांत आहे तसे केवळ पूरक राहिले पाहिजे. मातृभाषा ज्ञानभाषा होण्याचे अनेक फायदे आहेत. जगात असा एकही प्रगत देश नाही जेथे मातृभाषा ही ज्ञाननिर्मितीची भाषा नाही. आणि ज्या देशात मातृभाषेत ज्ञाननिर्मिती होत नाही असा एकही देश ज्ञान-निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याइतका प्रगत झालेला नाही. भाषिक राज्यांना अंतर्गत बाबतीत पूर्ण स्वायत्तता देऊन युरोपियन युनियनसारखी भारतीय संघराज्याची निर्मिती करून आमच्या भाषा आणि आमचे ऐक्य दोन्ही अबाधित राखणे अशक्य नाही... (पुढे वाचा)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------एका लोककथेत एक राजा होता. त्याला मुलबाळ नव्हते. राज्याला वारस नव्हता. त्याने देवाची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाला. राजाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .