‘उपमा’ हा मूळचा दाक्षिणात्य खाद्यपदार्थ आज महाराष्ट्रीय वाटावा इतका आपल्या स्वयंपाकघरात शिजवला जातो. पण गमंत म्हणजे हा शब्द आपण वेगवेगळ्या मराठी शब्दकोशांत शोधायला लागलो की आपल्याला या शब्दाचे जे अर्थ मिळतात, ते प्रेमातल्या उपम्याचे म्हणजेच तुलना या अर्थाशी संबंधित उपम्याचे. कृ. पां. कुलकर्णी यांच्या 'व्युत्पत्तिकोशा'त उपमा हा खाद्यपदार्थ सापडतो, पण तोही नंतरच्या आवृत्तींतील पुरवणीमध्ये. हा शोध पुढे चालू ठेवून गमतीने असंही म्हणता येईल की, मराठी माणसाला पोटोबापेक्षा तुलना करायला, दुसऱ्याची मापं काढायला अधिक आवडत असावं!
------------------------------------------------------------
‘प्रेमाला उपमा नाही कारण उपम्याला रवा नाही. रव्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला पैसे नाहीत, पैशाला नोकरी नाही’ अशी साखळी गुंफत पुढं जाणारं आणि पुन्हा प्रेमापर्यंत येऊन वर्तुळ पूर्ण करणारं हे गाणं तुम्ही शाळेच्या किंवा कॉलेजच्या पिकनिकला किंवा एखाद्या रिकाम्या तासाला म्हटलं असण्याची शक्यता आहे. आणि म्हटलं नसलं तरी ऐकलं तर नक्कीच असेल. या गाण्यात धमाल आली आहे ती ‘उपमा’ या शब्दामुळे. मराठीत ‘उपमा’ हा शब्द दोन भिन्न अर्थाने वापरला जातो. एकाचा अर्थ आहे तुलना तर दुसरा आहे खाद्यपदार्थ; पण हा फरक इतकाच नाही, तर हे दोन्ही ‘उपमा’ दोन भिन्न भाषाकुळातील आहेत.
हेही वाचलंत का?
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी अभ्यास केंद्र , मराठी प्रथम , शब्दव्युत्पत्ती , साधना गोरे
प्रतिक्रिया
शब्दांच्या पाऊलखुणा - उपम्याला उपमा नाही (भाग - सोळा)
मराठी प्रथम
साधना गोरे
2020-09-21 01:10:27

वाचण्यासारखे अजून काही ...

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - उत्तरार्ध
अज्ञात | 4 दिवसांपूर्वी
महात्माजींचीं सर्वच मतें राष्ट्रीय पक्षाला पसंत नव्हती.
पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 5 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
Rdesai
5 वर्षांपूर्वीखूपच सुंदर ! वाचताना मज आली.
5 वर्षांपूर्वी
उपम्याच्या उत्त्पत्तीपासून चव ,भूक ते मराठी माणसाची मापं काढण्याच्या आवडी पर्यंत अर्थ स्पष्ट करणारा लेख. शेतकर्यांच्या गंभीर प्रश्नापासून नोकरदारांच्या पैशातून प्रेमळ वर्तुळ साधणारा लेख. उपसर्गाच्या शब्दांची सफर घडवतो.
pvanashri
5 वर्षांपूर्वीछान
nvaishali1
5 वर्षांपूर्वीखुप छान .माहितीपुर्ण
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीनवीन माहिती मिळाली. धन्यवाद !
rsanjay96
5 वर्षांपूर्वीशब्दांच्या पाऊलखुणा ही लेखमाला रंजक आहे. वाचकांना हे वाचताना शब्दविकास प्रक्रिया समजते. डॉ. संजय रत्नपारखी