"पुस्तकं मुलांपर्यंत नियमितपणे पोहोचण्याची गरज आहे. यासाठी बालवाड्यांपासून शाळांपर्यंत शिकवणारे शिक्षक आणि वाचनालयं चालवणारे ग्रंथपाल यांचं प्रबोधन होण्याची गरज आहे. मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत सुसज्ज ग्रंथालय होतं, पण मुलांच्या हाती पुस्तकं लागली तर मुलं आणि पुस्तकं दोन्ही फुकट जातील असं वाटत असल्यामुळे की काय, आमच्या ग्रंथपालबाई काही ना काही कारणं काढून पुस्तकं द्यायच्या टाळत असत. अशा पुस्तकशत्रू आणि भाषाशत्रू लोकांमुळे मुलांच्या वाचन संस्कृतीचं वाटोळं झालं आहे. त्यामुळे मुलांच्या हातात त्यांना हवं ते आवडीचं पुस्तक देणारी शाळा ती आनंदी शाळा, अशी यापुढे व्याख्या केली पाहिजे." - मुलांच्या वाचनासंदर्भात पालक आणि शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदारीबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार.
...
मोठ्या माणसांसाठी लिहिणं आणि वाचणं या गोष्टी आपल्याकडे होतच असतात. पण, तेवढ्या अगत्याने आणि गांभीर्याने आपण लहान मुलांसाठी लिहितो का? आणि त्यांच्या गरजांचा विचार करतो का? मुलं जर लहानपणी एखादी भाषा आवडीने शिकली तर ती त्यांच्या मनात रुजते आणि मग वाढत्या वयात त्यांच्या विचारांचा, सर्जनाचा भाग बनते. काही वेळा पालक त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, पण दरवेळेस ते तसंच घडेल असं नाही. ज्यांच्या घरात लेखन-वाचनाची पार्श्वभूमी नाही, अशी अनेक माणसं कधी योगायोगाने, कधी परिसरातल्या कोणाच्या तरी मदतीने वाचनाकडे वळतात. अडखळत-अडखळत वाचायला शिकतात. त्यांना एका टप्प्यावर आपल्या वाचनाची दिशा सापडते. अशा वेळी त्यांच्या अवतीभोवती वाचनाचे वातावरण असण्याची गरज आहे. एकेकाळी गल्लीबोळात छोटी-मोठी वाचनालये असायची. गुलबकावली, सिंदबादच्या सफरी, इसापनीती, अरेबियन नाइटस्, चांदोबा, या आणि अशा अनेक पुस्तकांनी लहान मुलांचं भावविश्व भरून जायचं. आता मात्र तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांना देशभरातले पालक, त्यातही विशेषतः सुशिक्षित पालक बालवाड्या, प्ले स्कूल्स यामध्ये मुलांना कोंबून टाकत आहेत. मुलांना काही कळलं नाही तरी चालेल; पण त्यांनी पोपटपंची केली पाहिजे, अशी भावना निर्माण झाली आहे. शहरी मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांचे अनुकरण ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील पालक करू लागले आहेत. त्यामुळे मुलांनी 'काय वाचावं' यापेक्षा 'पाठ्यपुस्तक सोडून त्यांनी वाचावंच कशाला?' असं वाटणाऱ्या पालकांची
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, पु्स्तके
, वाचनसंस्कृती
, वाचन
, दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र