समाज भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि त्यातील भाषा नियोजन, भाषा धोरण या संकल्पना पाश्चात्त्य ज्ञान-जगतात १९६०च्या दशकात उदयास आलेल्या दिसतात. त्याच्या दोन दशकेआधी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी धोरणात्मक भाषा नियोजनाची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या राजकारणाची चर्चा केली आहे, हे विशेष आहे. मात्र त्यांनी हे विचार प्रसृत करून नव्वदी उलटली तरी आपण त्याची पूर्तता करू शकलेलो नाही.
...
गोंडवनातील प्रियवंदा, ब्राह्मणकन्या, विचक्षणा इ. कादंबऱ्या लिहिणाऱ्या; द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया, ॲन एसे ऑन हिंदूइझम : इट्स फॉर्मेशन अँड फ्यूचर, ॲन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, हिंदू लॉ अँड द मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ द हिस्टॉरिकल स्टडी देअर ऑफ, हे वैचारिक ग्रंथ लिहिणाऱ्या श्री. व्यं. केतकरांचे खरे जीवित कार्य म्हणजे ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’. १९३१ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या १६व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या भाषणात त्यांनी साहित्य संमेलनाचे स्वरूप काय असावे, साहित्य परिषदेचे कार्य, स्वभाषेच्या हितासाठी राजकारण करणे का आवश्यक आहे इ. बाबींचा खरपूस समाचार घेतला आहे.
मराठी साहित्य परिषद किंवा साहित्य संमेलन ह्यांच्यापुढील कार्य म्हणजे, केवळ काव्य आणि नाटक ह्यांविषयी चर्चा करण्याचे नाही. भाषारक्षण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट पूर्वी राजवाडे ह्यांनी आपल्या शारदोपासकांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अत्यंत आग्रहानें पुढे मांडलीच होती. “भाषा मरणार आहे तर तिचे अलंकरण काय करीत बसता?” असा प्रश्न त्यांनी जनतेपुढे टाकला. पण, त्यांना जनता बरीच खंबीर भेटली. भाषासंरक्षणासाठी अस्तन्या सावरून पुढे यावयाची इच्छा जनतेला नसल्यामुळे राजवाडे अभद्र बोलले म्हणूनच कांगावा करू लागली. राजवाडे ह्यांची तरफदारी करणारे लोकदेखील अधिक कर्तव्यतत्पर नव्हते. राजवाडे हे अभद्र बोलले नाहीत, ते मराठी भाषेचे विद्वेष्टे नाहीत, म्हणून सर्टिफिकेट द्यावयास काही लेखक पुढे झाले. जणू काय, ज्यांनी मराठी भाषेचा अभिमान धरून जगन्मान्यतेचा संन्यास केला, त्यांचे भाषाप्रेम सदाशिवपेठी वर्तमानपत्रकारांच्या सर्टिफिकेटानेच ठरणार होते. भाषारक्षणाचे कार्य परिषदांनी अंगावर घेतले पाहिजे, ह्या हेतूने राजवाड्यांनी उपरोधिक वाणीने जे कार्य लोकांपुढे मांडले; ते काम करण्यासाठी आलस्यमूलक जी नाखुषी असते, त्या नाखुषीमुळे कामचुकार महाराष्ट्रीय त्यास प्रेरणा करणाऱ्याच्याच अंगावर तुटून पडले. युद्धास बद्धपरिकर नसलेले लोक लढाईवर नेऊ इच्छिणाऱ्याच्याच अंगावर तुटून पडावेत ह्यात नवल नाही. तथापि, येथे हेही सांगितले पाहिजे की,
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
साहित्य संमेलन
, साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण
, सोळावे महाराष्ट्र साहित्य संमेलन
, भाषा नियोजन
, भाषा धोरण
, श्रीधर व्यंकटेश केतकर
, मराठी अभ्यास केंद्र
Santosh Gadhe
4 वर्षांपूर्वीखूप छान माहिती मिळाली