खिचडी भाषा


“शहरी म्हणताना कोणतं शहर, मुंबई, की पुणे की इंदूर की बेळगाव? आणि ग्रामीण वाचकाला महाराष्ट्रातलं बाकीचं ग्रामीण सलग कळेल याची शाश्वती नाही. मालवणी भाषा अहिराणी प्रदेशाला कळेल असं नाही, वऱ्हाडी भाषा कोल्हापुरी प्रदेशाला कळेल असं नाही. ‘असं काही वाचताना कंटाळा येतो’, अशी तक्रार एका प्रांतातले लोक दुसऱ्या प्रांतातल्या लिखाणाबद्दल करताना मी अनुभवले.” मराठी भाषेच्या बहुविधतेबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या भाषिक संस्काराबद्दल सांगतायत कादंबरीकार राजन खान -
कोणत्याही प्रदेशाची भाषा एकच असते. त्या प्रदेशातली माणसं एकाच भाषेत जगत असतात, पण त्यातल्या दोन माणसांची भाषा एकसारखी नसते. कोणत्याही एकाच भाषेतल्या दोन माणसांच्या भाषा वापरण्यात, हाताळण्यात, जिभाळण्यात  बारीक-बारीक बदल असतात. जुनी म्हण आहे, दर बारा कोसांवर भाषा बदलते. बारा कोस मोठे झाले, त्या बारा कोसांच्या आतसुद्धा भाषेचे कित्येक फरक असतात. एका कुटुंबातल्या माणसांच्या भाषेतसुद्धा छोट्या-छोट्या तफावती असतात. मी तर म्हणतो की, कोणत्याही दोन माणसांच्या भाषा वापरण्यातही सूक्ष्म-सूक्ष्म भेद असतात. त्यात काही शब्दांचा फरक पडतो, शब्दांच्या उच्चारांचा फरक पडतो, शब्दांच्या हेलांचा फरक पडतो, अक्षरांचा सुद्धा फरक पडतो. वेलांट्या, उकार, काना, मात्रा यांचाही फरक पडतो. एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरण्याचा फरक तर ठळकच असतो. उदा. कृष्ण, क्रिष्ण, किरिष्ण – पुन्हा ण चा न/ कृपा, किरपा/ पृथ्वी, प्रिथ्वी, पिरिथवी/  सवाष्ण सवाशिण, सुवाशिणी, सुवासिनी. समाजाची भाषा एकच असते, पण समाजातल्या प्रत्येकाची भाषा थोडीबहुत आपापली असते. प्रत्येक माणूस भाषेचे आपल्यावर होणारे कोणते संस्कार स्वीकारतो, यावर ती भाषेची बारीक तफावत अवलंबून असते, कित्येक माणसं भाषा हाताळता-हाताळता किंवा जिभाळता-जिभाळता नवे शब्द, नवे उच्चारही तयार करत राहतात. तो भाग आणखी वेगळा.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , राजन खान , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen