“कविता या वाङ्मयप्रकारांवर ढीगभर निरंतर शोधप्रबंध लिहिले जातात. ‘एका लेखकाचा अभ्यास’ या नावाखाली भरमसाट संशोधन होताना दिसते. कालखंडाची निवड करून कथांवर, कादंबरींवर संशोधनांचे सोपस्कार तडीस नेले जातात.” – डॉ. केशव सखाराम देशमुख यांचे विद्यापीठांमधील भाषा-वाङ्मयाच्या संशोधनावरील भाष्य -
...
समीक्षेला विचारांची भाषा असे संबोधले गेले आहे, तर संशोधनाला चिंतनाची भाषा म्हटलेले आहे. वेळ देऊन-घेऊन करावयाची कृती अशीही संशोधनाची ओळख नमूद केली जाते. कला, विज्ञान, वाणिज्य किंवा यासम बहुविध ज्ञानशाखांमध्ये संशोधन ही अव्याहत सुरू असणारी प्रक्रिया असते. जगभरातील सुप्रतिष्ठित संस्था आणि विद्यापीठे संशोधनाची मान्यताप्राप्त केंद्रे असतात. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा चमू अथवा एखादा संघ यांच्या वतीने संशोधनाचे कार्य अथकपणाने चालत असते. देश, समाज, संस्कृती, भाषा, वाङ्मय या पाच महत्त्वाच्या विषयांना संशोधनांमधून काय हितावह आणि कल्याणकारी, प्रगतिवर्धक उपयोग होतो, यावरही त्या संशोधनाची गुणवत्ता अधोरेखित होत असते. विद्यापीठे आणि संशोधन ह्या दोन गोष्टी विकास आणि समाज यांच्यासाठी विलक्षण समजल्या जातात. जगातील महत्त्वाची एकूण विद्यापीठे त्यांच्या संशोधनांमुळे ओळखली जातात.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रबंध लेखन
, चिंतनाची भाषा
, डॉ. केशव सखाराम देखमुख
, मराठी अभ्यास केंद्र
Sanjay Ratnaparkhi
3 वर्षांपूर्वीउत्तम विवेचन वाचायला मिळाले. भाषा संशोधकापर्यंत हा लेख जायला हवा आहे. संशोधन करण्यापूर्वी विषय निवड करताना यातून मार्गदर्शन मिळेल.