असे दिसते की, चौकस युरोपियन मंडळींची आणि शिवाजीची भेट झाली असतां त्यांची चित्रकार युरोपियनांनी काढलेली कित्येक चित्र उपलब्ध झालेली आहेत. अशा चित्रांपैकी सर्वांत जुने चित्र शिवाजीमहाराजांची सुरतेवर स्वारी झाली त्या प्रसंगी कोणा डच चित्रकाराने काढलेले आणि हेग येथील व्हॅलेंटिन संग्रहात असलेले शिवाजीमहाराजांचे चित्र श्री. बेंद्रे यांनी प्रसिद्ध केलेले आहे.
श्री. बेंद्रे यांच्यापूर्वी एकदोघांनी हे चित्र म्हणजे याची प्रतिमा प्रसिद्ध केलेली आढळते. परंतु बेंद्रे यांनी आपले काम अधिक कसोशीने केले आहे. ऑर्मने इ.स. १७८२ मध्ये आपल्या पुस्तकांत हेच चित्र थोडा हात फिरवून दिलेले आहे. हे मूळ चित्र सर जदुनाथ सरकार यांच्या तर्काप्रमाणे इ.स. १७१२ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती आले असावे.
शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र
मासिकांची उलटता पाने
स्मरणरंजन
2021-05-05 11:41:02