आमच्या हापिसांतल्या मानकाम्याला मला त्याचें गाणें आवडतें असें कां वाटतें, तेंहि मला कोडें आहे ! वेळी अवेळीं मला गांठून तो आपल्या चीजा ऐकवीत असतो. कुशाभाऊंच्या मुलींच्या लग्नाची त्यांच्यापेक्षांहि मला काळजी आहे, असें एक आपलें त्यांना वाटतें. गोन्सालवीसचे एकदां डोकें दुखत होतें, त्याला घरून आल्याची वडी आणून दिल्यापासून मला 'हर्बल' मेडिसिनची खूप माहिती आहे असा त्याचा एक गैरसमज आहे. पण ह्या गैरसमजांचा मला फारसा त्रास नाहीं. किंबहुना त्यांतून माझ्याविषयीं आदर वाढला आहे. पण 'वेटर' लोक मात्र झुरळाकडे वाघानें पहावें तसें माझ्याकडे पहातात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .