आईन्स्टाईनची खोली - भाग २


अंक - अंतर्नाद जानेवारी २०१४ मी आईनस्टाइनची अभ्यासिका पाहायला गेलो होतो, ते १९८१ मध्ये. १९५५  मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आईनस्टाइन वारले त्याला त्यावेळी जेमतेम पंचवीस वर्षं झाली होती आणि तरीही ज्या अभ्यासिकेत ते वीस-बावीस वर्षं काम करत, ती कुठे आहे, ते त्या संस्थेतील कुणालाच निश्चित ठाऊक नव्हतं! इन्स्टिट्यूटमध्ये ते आले तेव्हा जगातील अत्यंत नावाजलेले, आदरणीय व प्रतिष्ठित म्हणून त्यांचा लौकिक होता आणि तरीसुद्धा त्यांची बसायची खोली तिकडच्या कर्मचार्‍यांनासुद्धा नीट ठाऊक नव्हती. म्हणजे आता २०१३ मध्ये, आईनस्टाइन इथे वीस वर्षं काम करत होते, हेपण कदाचित ते विसरले असतील. उद्या कोणी प्रिन्स्टनला इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमध्ये जाऊन त्यांच्या अभ्यासिकेबद्दल विचारू लागला, तर त्याला निराश होऊन परतावं लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही किंवा अतिशय वाईट पण अशक्य नाही अशी बाब म्हणजे एखादा तिथला कर्मचारी भलत्याच खोलीकडे विश्वासाने बोट दाखवील. हा कल्पनाविलास नाही. कधी कधी खरंच असं होतं. आपल्याकडचंच एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची खोली. आईनस्टाइन बसत त्या खोलीवर नावाची पाटी, इतर काही खूण असलं काहीच नव्हतं, तर या खोलीवर पंडित नेहरूंचं नावच नव्हे तर ते कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत तिथे राहिले, या तारखासुद्धा होत्या. १९४२च्या चलेजाव चळवळीच्या दरम्यान बहुतेक सर्व काँग्रेस नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवलं होतं, त्यावेळच्या भारावलेल्या वातावरणात या जागेला खूपच महत्त्व प्राप्त झालं होतं आणि नंतर ते राष्ट्रीय स्मारक झालं. स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरू आपले पंतप्रधान झाले. १९४७पासून १९६४ मध्ये त्यांचा मृत्यू ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , अनुभव कथन , स्थल विशेष , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. अमर पेठे

      8 वर्षांपूर्वी

    छान माहिती मिळाली.

  2. dhampall

      8 वर्षांपूर्वी

    छान , मस्तच लिहीले आहे , वास्तववादी पण गमतीशीर छानच

  3. natujaya

      8 वर्षांपूर्वी

    आईन्स्टाईनच्या अभ्यासिकेत मॅक्सवेल ,फॅरॅडे ,न्यूटन या संशोधकांबरोबर महात्मा गांधींचा फोटो होता .

  4. nbgadgil

      8 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लिहिलंय !! अगदी वास्तववादी, आपल्या (फार विचार न करता आपण बाळगत असलेल्या) समजुतींना धक्का देणारं, विचार करायला लावणारं !!! शिवाय, या लेखनात कोठेही अभिनिवेश किंवा अनाठायी टीकेचा सूर अजिबात जाणवत नाही हे स्वागतार्हच !!! छान स्थितप्रज्ञता बाळगून लिहिलंय........ त्याचं पुस्तक वाचायला उद्युक्त करणारं !!!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen