कुवत आणि अपेक्षा यांचे समीकरण सहसा जुळत नाही. अपेक्षा तयार होतात त्या आपल्या आजबाजूला जे दिसते त्यातून आणि कुवत मात्र जी काही असते ती आपलीच असते. मुलांच्या बाबतीत आई वडिलांकडून हे नेहमीच होत असते आणि मुले त्या अपेक्षांनुरुप करू शकली नाही, तर त्यातून नैराश्य येते. अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते. ‘वास्तवाची जाण नसलेली स्वप्ने’ हा आपल्या समाजात आजही एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तसा तो पन्नास वर्षांपूर्वीही होता. स्वभावाला जसे औषध नसते तसेच अवाजवी अपेक्षा बाळगण्यालाही नसते. दहावी-बारावीचे निकाल, प्रवेश मिळविण्यासाठीची स्पर्धा या काळात शिगेला पोचली आहे . अशावेळी तर यासारख्या लेखांची अधिकच गरज असते. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख शब्दही न बदलता आजच्याच वृत्तपत्रातला म्हणून खपवता येईल...भाषा तेवढी थोडी जुन्या वळणाची आहे, एवढेच. मूळ शीर्षक- ह्याला जबाबदार कोण? ********** त्या दिवशी वर्तमानपत्रांतली ती अभद्र बातमी वाचून मी हादरलेच. क्षणभर माझा त्या बातमीवर विश्वासच बसेना. चारपांच दिवसांपूर्वी आमच्या मधूकडे येऊन तासभर हास्यविनोदाचा फुलोरा फुलवत वातावरण उजळून टाकणारा, आपल्याला पुढे काय करायचंय् याची मनोहरी चित्रें रंगविणारा आशावादी वसंता आज काळाच्या उदरात गडप झाला होता. नव्हे, त्याने स्वतःहून त्या अज्ञातांत उडी घेतली होती. ‘मॅट्रीकची परीक्षा तिसऱ्या वर्गात पास झाल्यामुळे, वसंत गुप्तेने गाडीखाली आत्महत्या केली’ असे वर्तमानपत्रांत लिहिले होते. मी हतबुद्ध झाले होते. परीक्षा मनासारखी न उतरल्यामुळे जीवासारखी अमोल वस्तू इतक्या सहजतेने उधळून लावणारी मनोवृत्तीच मला अनाकलनीय वाटली. अन् मग नापास झाला म्हणून, प्रेमभंग झाला म्हणून, पुढे शिक्षण घेता येत नाही ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चिंतन
, पुनश्च
, छबूताई कवीश्र्वर
, अमृत
Shrikant Pawar
4 वर्षांपूर्वीचांगला लेख
SachinBhoir
6 वर्षांपूर्वीआजही ह्या लेखातल्या बऱ्याचश्या गोष्टी तंतोतंत लागू होतेय. लोकांचे जीवनमान नक्कीच उंचावले आहे परंतु जीवनासंदर्भातील बऱ्याच गोष्टी आजही पूर्वा ज्या होत्या त्याच आहेत. थोड्या मानसिक, थोड्या सामाजिक, कौटुंबिक. वर वर सुखी दिसणारी कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबे आतून तितकीच धास्ती घेणारी आहेत जेवढी पूर्वी होती. मुलांचे पालनपोषण सकस विचारांनी करणे हे गरजेचे झाले आहे. भावनेची जपवणूक, मनाला संतुष्ट ठेवणे, नातीगोती ही आजही तितकीच गरजेची आहेत जेवढी पूर्वी होती.
Ajitdixit
6 वर्षांपूर्वीI think with social media , things are changing. There was earlier belief of connection between ranks and success which is now getting dissolved. What at the end is emerging is expertise band skills in given domain. I feel lot of difference and maturity when now a days I talk to students. Engineering and medical dominance has gone and all domains are equally open for opportunities. Globalisation , IT , AI etc have changed everything
bookworm
6 वर्षांपूर्वीदुर्दैवाने आजही हे संदर्भ लागू पडत आहेत. तुलनेने आज उपलब्ध वाटांमध्ये भर पडली आहे पण वाढलेल्या लोकसंख्येमुळे चित्र फारसं बदललं नाहीये.
smileasalways
6 वर्षांपूर्वीThe main reason for this unhealthy state of affairs is the belief that success in life can be achieved only by academic excellence.People need to remember that academic record is only a small part of life.One can strive to achieve success in other fields such as music, sports,dramatics, poetry etc etc.Also one needs to understand that money and position does not equate to happiness. We need to allow children to select any field of their choice and then pursue that with passion to achieve eccellence in that field.Money and recognition by society will automatically be available as a by-product.Look at Sachin Tendulkar and M S Dhoni
SMIRA
6 वर्षांपूर्वीहो खरय जीवघेणी स्पर्धा ही तितकीच कारणीभूत आहे याला असं मलाही वाटतं.
vinayakbapat
6 वर्षांपूर्वीआजही हा लेख तंतोतंत लागू शकतो.
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीलेख वाचून धक्काच बसला. १९६५ साली असे घडत असेल हे माहीतच नव्हते... १९७५ साली मी दहावीची परीक्षा दिली तेव्हा मला असे कुठे जाणवले नव्हते.. माझ्या बाबतच नव्हे तर आजूबाजूला किंवा परिचितांमध्ये अशी अपेक्षांची ओझी असणारे कुणी माझ्या माहितीत नव्हते... मार्गदर्शन बरेच लोक करायचे पण त्यात आपुलकी होती. त्यामुळे १९६५ सालच्या घटना ह्या घटना वाचून नवल वाटले. प्रस्तावनेत म्हट्ल्याप्रमाणे हा लेख आजच्या काळात सही सही लागू होतो. अर्थात लेखाच्या शेवटी फक्त आईवर जबाबदारी टाकली आहे हे पटत नाही..असो. आज स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढल्याने अशा घटना जास्त घडतात, हे खरे.