नियतकालिकांच्या जगातील फेरफटका- जून'१९


शेक्सपिअर आणि विशाल भारद्वाज काही गोष्टी, काही विषय हे जसे कालातीत असतात, त्याप्रमाणे स्थळकाळाचे बंधन तोडून ते सर्वत्र पोहचत असतात. अशापैकीच एक गोष्ट म्हणजे विल्यम शेक्सपिअर आणि त्याचे साहित्य. १५६४ ते १६१६ हा त्याचा कार्यकाळ. पण आजही त्याचं साहित्य ताजं वाटतं. ते संदर्भहिन झालेलं नाही. आपले वाङ्मय वृत्त (संपर्क – ०२२-२४३६२४७४) च्या जून २०१९ अंकांत माध्यमांतर सदरात संदीप गिऱ्हे यांनी ह्याच विषयावर उहापोह केला आहे. त्याचं शिर्षक आहे – ‘मानवी भावनांची गुंतागुंत.’ हा शेक्सपिअरच्या साहित्याचा गाभा. ह्या लेखात सुरवातीला त्यांनी थोडक्यात शेक्सपिअर महात्म्य सांगितलं आहे. ते लिहितात, ‘शेक्सपिअर ..... ! हा फक्त शब्द नाही, फक्त नाव नाही, तर एक विचार आहे. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाटकं आणि सॉनेट मिळून सर्व साहित्यात एकूण १,१८,४०६ ओळींमध्ये ८,८४,६४७ शब्द लिहिलेले आहेत (Marvin Spevack’s Concordances) एवढ्या अजस्त्र साहित्य निर्मितीमुळे शेक्सपिअर महान ठरत नाही तर त्या साहित्यातील विचारधारेमुळे महान ठरतो. पुढे त्यांनी नेमकेपणानं म्हटलं आहे की, ‘साहित्यासोबत इतर सर्व कलाप्रकारातील नवउत्साही आणि प्रगल्भ असा दोन्ही कलाकारांना शेक्सपिअरच्या लिखाणातून प्रेरणा मिळत आलेली आहे.’ असं सांगून त्याचा प्रभाव कोणकोणत्या कलांवर पडलेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि गेल्या शंभर वर्षांत या कलाकृतीवर पाचशेपेक्षा जास्त चित्रपट जगभरात निर्माण केले गेले आहेत. यामध्ये देखील हॅम्लेट, किंग लीयर, ऑथेल्लो आणि मॅकबेथ या चार शोकांतिकावरच जास्त चित्रपट निर्माण झालेले आहेत, ह्याकडे लक्ष वेधलं आहे. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुनश्च , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    छान

  2. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    शेक्सपिअर च्या नाटकांवर आधारित चित्रपटांच्या यादीत “रोमिओ-जुलिएट” चा उल्लेख अनवधनाने राहून गेलेला दिसतो. इटलीमधील सत्यघटनेवर आधारित हे नाटक होते असे म्हटले जाते. “खानदान की इज्जत” असे सुलभीकरण करून, या कथेवर आधारित शेकडो हिंदी व अन्य भाषिक सिनेमे आजपर्यंत येऊन गेले, आजही येत आहेत आणि पुढेही येत राहातील.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen